नाशिकची द्रांक्ष परदेशी गोड ३६ देशात निर्यात कार्गो विमानसेवा मागणी

नाशिकची द्रांक्ष परदेशी गोड ३६ देशात निर्यात
कार्गो विमानसेवा मागणी
नाशिक : प्रतिनिधी
नेहमी प्रमाणे यावर्षी सुधा नाशिकच्या द्राक्षांनी आपली परदेशी मागणी कायम ठेवली असून निर्यातीसाठी सुरुवात झाली आहे. यामध्ये  कठोर नियमांची पूर्तता केल्याने यावर्षी भारतीय द्राक्षांनी चीन आणि रशियाला  देखील निर्यात केली आहे. जवळपास 36 देशांमध्ये 61,382 मेट्रीक टन द्राक्ष निर्यात केली आहेत. मागील वर्षीपेक्षा ही निर्यात आठशे कंटेनरने अधिक आहे.त्यामुळे ही निर्यात अजून वाढत जाणार आहे.
आपल्या देशातून नाशिकमधून हे द्रांक्ष युरोपातील जर्मनी, नेदरलँड, युनायटेड किंगडमसह 17 देश, सिंगापूर, आखाती देश, रशिया अशा इतर 19 देशांमध्ये निर्यात होत आहे. या देशांमध्ये दोन चार नव्हे तर तब्बल 4,460 कंटेनरमधून 61 हजार 382 मेट्रीक टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. विशेष म्हणजे द्राक्ष निर्यातीतला आपला प्रमुख स्पर्धक असलेल्या चीननेच भारताकडून पन्नासहून अधिक कंटेनर द्राक्ष आयात केली आहेत. 
नाशिक जिल्ह्यात 34 हजार 11 शेतक-यांनी निर्यातक्षम द्राक्षांचं उत्पादन घेतले आहे . तर नवीन असे दहा हजार अधिक शेतकरी या व्यवसायात उतरले आहेत.या फळासाठी नाशिक येथील  22 हजार हेक्टरपेक्षा जास्त लागवड झाल आहे. मात्र विमानतळ असून विमान सेवा नाही अशी स्थिती आहे. तर आम्हाला  कार्गो विमानसेवा मिळाली  कार्यक्षमता वाढवू शकतो असा विश्वास शेतकरी दाखवत आहेत.
  • गेल्यावर्षी अवकाळी पाऊस आणि खराब वातावरणामुळे निर्यातक्षम द्राक्षांच्या दर्जावर विपरीत परिणाम
  • यंदा द्राक्षाचा हंगाम थेट फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाला
  • दिंडोरी, निफाड, नाशिक या प्रमुख तालुक्यात द्राक्षबागांचे सर्वाधिक क्षेत्र
  • देशातून सर्वाधिक द्राक्ष निर्यातीत नाशिकचा टक्का अधिक
  • यंदा द्राक्ष हंगाम सुमारे दोन महिने उशिरा सुरू होऊनही सुमारे ५० हजार १०० मेट्रिक टन द्राक्षांची नोंद निर्यातीसाठी
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.