#GOODNEWS : १ लाख मॅट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाल्याची नोंद

 नाशिक जिल्ह्यातून ४ एप्रिल २०१७ पर्यंत १ लाख मॅट्रिक टन द्राक्षची निर्यात झाल्याची नोंद झालेली आहे. या महिन्याच्या अखेर पर्यंत निर्यात सुरू राहणार असून द्राक्ष निर्यात ही आणखी वाढणार आहे. मागील वर्षी एप्रिलच्या  पहिल्या आठवड्यात द्राक्षाची ९० हजार मॅट्रिक टन निर्यात झालेली होती.या वर्षी आत्तापर्यंत ७५ हजार मॅट्रिक टन द्राक्ष हे युरोपमध्ये पाठविण्यात आलेले आहे.

द्राक्ष निर्यात हि एप्रिल अखेर पर्यंत सुरु राहणार आहे.द्राक्ष निर्यातीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून मागील वर्षी झालेल्या १.०८ लाख टन निर्यातीचा उचांक मोडीस निघण्याची शक्यता आहे.

युरोपमध्ये चिली द्राक्षची या वर्षांपासून दमदार आगमन झाल्याने भारताच्या द्राक्षचे दर हे युरोप आणि रशिया मध्ये घसरले आहे.द्राक्षाची निर्यात जरी एकीकडे  मोठ्या प्रमाणात देशाला परकीय चलन मिळत असले तरी द्राक्षचे दर कमी झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे.या वर्षी युरोपमध्ये द्राक्ष निर्यात १०० रुपये किलो वरून ५० रुपये किलो पर्यंत आलेले आहे.रशिया मध्ये सुद्धा द्राक्ष हे मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने तिकडे सुद्धा द्राक्ष हे ६० रुपये किलो वरून ३० रुपये किलो पर्यंत आलेले आहे.

या पूर्वी चिली हा देश फक्त युके मध्ये द्राक्ष निर्यात करीत होता,या वर्षांपासून सिलीने आपली द्राक्ष हे युरोप आणि रशिया मध्ये सुद्धा निर्यात सुरु केल्याने भारताच्या द्राक्षचे दर हे कमी झालेले आहे.

या हंगामात आता पर्यंत नाशिक जिल्ह्यातून १ लाख मॅट्रिक टन द्राक्षाची निर्यात झालेली आहे.जिईएआय च्या माहितीनुसार या हंगामात जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात हि २५ टक्के ने वाढण्याची अपेक्षा आहे.द्राक्षाची निर्यात हि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात सुरु आहे.जिल्यातून ५६ हजार एकर मध्ये द्राक्ष लागवडची नोंद करण्यात आलेली आहे.मागील वर्षी नाशिक जिल्हातून द्राक्षाची १ लाख ८ हजार टन निर्यात झालेली होती.त्यापैकी ७५ हजार टन द्राक्ष हे युरोप मध्ये आणि ३३ हजार टन द्राक्ष हे रशिया,बांगलादेश,दुबई मध्ये पाठवले गेले होते.

उत्तम गुणवत्ता आणि चांगले स्पर्धात्मक दर यामुळे आयातदारांनी भारतीय द्राक्षांना पसंती दिली आहे .मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षीही जास्त मागणी मिळत आहे .मात्र भारतीय द्राक्षांची जागतिक पत वाढत असली तरीहि कायम टिकवून ठेवण्याचेच खरे आव्हान राहणार आहे .

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.