Good News आठ दिवसांच्या बालकासहा लासलगाव कोविड दक्ष विभागमधून शंभर रुग्णांना डिस्चार्ज

नाशिक, दि. १५ जुलै , २०२० लासलगाव तालुक्यातील कोविड दक्ष विभागातील डॉक्टर, परिचारिका आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोविड आजार असणाऱ्या रुग्णांची योग्य ती काळजी घेतल्याने या विभागातून आतापर्यंत तब्बल शंभर कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णांमध्ये आठ दिवसांच्या बालकाचाही समावेश असून सर्व रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे हे यश मिळाले असल्याने, विभागात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.

या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग अतिशय योग्य पद्धतीने रुग्णांची काळजी घेत असल्याचे येथील वैद्यकीय पथकाने सांगितले. यावेळी डॉ. अनंत पवार यांच्यासह डॉ. राजाराम सैंद्रे, कोविड केअर सेंटरचे डॉ. बाळकृष्ण अहिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन बरदपूरकर, डॉ. राहुल उडपी उपस्थित होते.

कोरोना मुक्त आठ दिवसांचे बालक

आज बुधवार दिनांक 15 जुलै रोजी 12 दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर 21 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, यामध्ये आठ महिन्यांचा बालकासह अवघ्या आठ दिवासांच्या नवजात बालकाचाही समावेश होता. या सगळ्यांची काळजी घेतांना या सेंटरमधील एकही कर्मचारी आजपर्यंत आजारी पडला नाही, हे देखील विशेष.

सदर विभागातील रुग्णांची रोगप्रतिकार क्षमाता वाढविण्यासाठी योग व व्यायाम या माध्यमातून प्रोत्साहित केले जाते. तसेच त्यांच्या आरोग्यात लवकर सुधारणा होऊन त्यांची रोगप्रतिकार क्षमाता वाढण्यासाठी रुग्णांना वेळेवर नाष्टा व सकस आहार तसेच पिण्यासाठी गरम पाणी आणि काढदेखील दिला जातो.

कोरोना आजार झालेल्या रुग्णांना याकाळात खरी गरजे असते ती मानसिक आधाराची, आणि तिच गरज ओळखून येथील सर्व डॉक्टर, सहकारी व इतर कर्मचारी रुग्णांशी आपुलकीने वागून त्यांना या आजरातून बाहेर येण्यास मदत करतात.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.