गोल्डन एज बॅडमिंटन लीग : सुपर जायंट्सला विजेतेपद, आदिरो इगल्स उपविजेते

नाशिक : रचना स्पोर्ट्स आणि कल्चर अकादमीतर्फे आयोजित ‘गोल्डन एज बॅडमिंटन लीग’च्या पहिल्या पर्वात अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात डॉ. प्रीतम जपे आणि रवींद्र​ आव्हाड यांच्या सुपर जायंट्स संघाने आदिरो इगल्सचा ३-२ असा पराभव करत विजेतेपदाच्या चषकावर आपले नाव कोरले. सावरकर नगर, गंगापूर रोड येथील रचना अकादमीच्या कोर्टवर झालेल्या या ‘जीएबीएल २०१७-१८’ मध्ये व्हेटरन गटाचे (वयवर्षे ३५+) सहा संघांनी एकमेकांशी स्पर्धा केली. golden age badminton league super gians adiro eagles gabl 2017

रविवारी (दि. २४) संध्याकाळी झालेला हा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. आदित्य आणि रोहित गोखले यांच्या आदिरो इगल्सने सुरुवातीचे दोन सामने सामने जिंकत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आदिरो इगल्सचे विक्रांत करंजकर आणि सुनील भाईबंग यांनी सुपर जायंट्सच्या गणेश लांडे आणि एन. जोशी यांचा २१-५, २१-११ असा सरळ सेटमध्ये पराभव करत संघासाठी १-० अशी आघाडी मिळवली. ही आघाडी अश्विन सोनवणे यांनी अतुल जगताप यांचा २६-२४, २१-९, २१-१४ असा पराभव करत २-० अशी वाढवली.

स्पर्धा जिंकण्यासाठी आदिरो इगल्सला केवळ एक सामना जिंकणे आवश्यक असताना सुपर जायंट्सचे रवींद्र आढाव आणि डॉ. प्रीतम जपे यांनी अटीतटीचा झालेला तिसरा सामना १६-२१, २१-१८, २१-१७ असा जिंकत आपल्या संघाच्या जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. चौथा सामना भ्रमर सेनेगर आणि राजेश पाथरकर यांनी २१-१५, २१-१३ असा सहज जिंकत सामना बरोबरीत आणला.

निर्णायक सामन्यात सुपर जायंट्सच्या शशिकांत पाटील आणि भारत शिंगणे यांनी आदिरोच्या मिलिंद देशमुख आणि पंकज जोशी या जोडगोळीचा त्यांत सहज असा २१-०९, २१-१३ असा पराभव एकरात विजेत्पाडावर शिक्कामोर्तब केले. शेवटचे तीनही दुहेरी सामने जिंकत सुपर जायंट्सने आदिरो इगल्सचा तोंडचा घास पळवत स्पर्धा खिशात घातली. सुपर जायंट्स संघाला योगेश एकबोटे यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाले.

golden age badminton league super gians adiro eagles gabl 2017 गोल्डन एज बॅडमिंटन लीग सुपर जायंट्स विजेतेपद, आदिरो इगल्स Nashik Sports News On Web ट्रंप मॅच trump match point निवेक स्पोर्ट्स सेक्रेटरी संदीप गोयल रचना स्पोर्ट्स आणि कल्चर अकादमी शटलर्स ​निवेक मास्टर्स ​राज वॉरिअर्स ​व्हायब्रन्ट स्मॅशर्स

दरम्यान कोणतीही बोली न लागलेल्या खेळाडूंसाठी असलेल्या जंबल डबल प्रकारात भावेश जेठवा आणि राहुल जाधव हे विजेते ठरले. त्यांनी किशोर साखला आणि विजू एनएस यांचा पराभव केला.

निवेकचे स्पोर्ट्स सेक्रेटरी संदीप गोयल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी सहभागी सर्वच खेळाडूला पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्री. गोयल यांनी अंतिम मुकाबल्यात झालेल्या अटीतटीच्या झालेले सामने अत्यंत उर्जा देणारे असून यात अखेर बॅडमिंटन जिंकल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी दुबई इंटरनॅशनल पॅरागेम्समध्ये रौप्य पदक विजेत्या निलेश गायकवाड याचाही विशेष सत्कार करण्यात आला.

ट्रंप सामन्यांमुळे वाढली चुरस

लीग पद्धतीने खेळली गेलेली नाशिकमधील ही पहिलीच स्पर्धा असून एक एकेरी आणि चार दुहेरी अशा पद्धतीने एका सामन्यात दोन संघ पाच वेळा एकमेकांशी भिडले. यात एक पर्यायी म्हणून ट्रंप मॅच खेळवली गेली. या सामन्यात जिंकणाऱ्या संघाला अधिकच एक गुण मिळतो तर हरणाऱ्या संघाचा एक गुण कमी होतो. यामुळे गुणात्मक स्पर्धेमध्ये अत्यंत चुरस बघावयास मिळाली. golden age badminton league super gians adiro eagles gabl 2017

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राजेश पाथरकर, एम. एस. राणा, अतुल संगमनेरकर, एम.जी. मोदी, अमित देशपांडे, डॉ. राजेंद्र जाधव यांच्या संयोजन समितीने प्रयत्न केले.

गोल्डन एज बॅडमिंटन लीग – golden age badminton league super gians adiro eagles gabl 2017

आदिरो इगल्सला हरवत सुपर जायंट्स विजयी

लीग स्वरूपात खेळली गेलेली नाशिक मधील पहिलीच बॅडमिंटन स्पर्धा

सहा संघ, ८९ खेळाडू

ट्रंप सामन्यांमुळे वाढली चुरस

Like Our – Nashik On Web’s Facebook Page

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.