मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत नाशिकला सुवर्ण

२७ व्या मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत नाशिकच्या यशवंत व्यायामशाळेच्या खेळाडूंची सुवर्ण कामगिरी. स्मित गर्गे, श्रयेश जाधव, मानव फुले, यांची महत्वाची भूमिका.

नाशिक : बृहन्मुंबई जिल्हा जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या वतीने मुंबई येथील जवाहर विद्याभवन येथे नुकत्याच २७ व्या मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय रिदमिक आणि आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या यशवंत व्यायाम शाळेच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवून अत्यंत बहारदार कामगिरी करून या स्पर्धेवर आपली छाप पाडली. रिदमिक जिम्नॅस्टिक्स आणि आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स अश्या दोन प्रकारांचा समावेश होता. यामध्ये यशवंत व्यायामशाळेच्या संघाने चांगली सांघीक कामगिरी करत आपल्या खात्यात तब्बल १८३.४३ गुणांची नोंद केली. या यशामुळे यशवंत व्यायामशाळेच्या संघाची कामगिरी सर्व स्पर्धकांमध्ये सरस ठरली आणि त्यांना सर्वसाधारण विजेतेपद पटकावण्याचा मान मिळाला. यामध्ये मुंबईच्या चेम्बूरच्या पवनपुत्र व्यायाम शाळा संघाने १७८.१० गुण  मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला,  तर दादर, मुंबईच्या समर्थ व्यायाम शाळेने १७७.३० गुण  मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
औप्रेटस चॅम्पिअनशिप मध्ये फ्लोअर एक्सरसाईस प्रकारात यशवंत व्यायाम शाळेच्या श्रेयस जाधवने जोमाने प्रयत्न करून १०.७५  गुण पटकावून द्वितीय क्रमांक मिळविला, तर रोमन रिंग या प्रकारातही श्रेयस जाधवने चांगला खेळ करत १०.४० गुण मिळवून तृतीय स्थान पटकावले. व्हॉल्टिंग हॉर्स या प्रकारात यशवंत व्यायाम शाळेच्या मानव फुले याने शर्थीचे प्रयत्न करून १०. ८० गुण पटकावून द्वितीय क्रमांक मिळविला, तर प्यारेलल बार प्रकारातही मानव फुलेने अगदी तसाच खेळ करून १०. ५५ गुणांसह  द्वितीय क्रमांक पटकावला. हॉरीझॉन्टल बार या प्रकारात यशवंत व्यायाम शाळेच्या स्मित गर्गेने जोमाने खेळ करून १०. ३३ गुणांची कमाई करत तृतीय स्थान मिळविले.

नाशिकच्या यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने खेळणारे हे सर्व खेळाडूं गेल्या ७ वर्षांपासून येथे नियमित सराव करत आहेत. त्यांना यशवंत व्यायामशाळेचे जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक संदीप शिंदे आणि श्रीराज काळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील,  छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक आनंद खरे, कुमार शिरवाडकर, प्रीतीश लेले, आकाश दाणी, कौस्तुभ सोनावणे, रोहित वाघ यांनी अभिनंदन करत खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे कौतुक करून केले.

फोटो मध्ये : बृहनमुंबई  जिल्हा जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या वतीने मुंबई येथे आयोजित २७ व्या मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय रिदमिक आणि आर्टिस्टिक जिमन्यास्टिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारे खेळाडू स्मित गर्गे, श्रयेश जाधव, मानव फुले, यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील , क्रीडा संघटक आनंद खरे, प्रशिक्षक संदीप शिंदे, श्रीराज काळे आदी.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.