सोमवारपासून गोखले एज्युकेशन सोसायटीचा शतकपूर्ती सोहळ्याचा शुभारंभ

डॉ.माशेलकरडॉ. काकोडकरडॉ. निगवेकर, स्वामी जनार्दनदासजी आदींची उपस्थिती Gokhale Education Society’s foundation hundred years ceremony starts Monday

नाशिक:

– ‘शतपट’, शिवकालीन, विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन

– १२ फेब्रुवारीपासून शिवाजी महाराजांवर व्याख्यानमाला

– १९ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यक्रम

– गुरुदक्षिणा सभागृहाचा कोनशिला

– नामदार गोखलेंना पुष्पांजली

सर्वसामान्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या हेतूने प्रि.टी.ए. कुलकर्णी यांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या नावाने १९ फेब्रुवारी १९१८ रोजी स्थापन केलेल्या गोखले एज्युकेशन सोसायटीचा शतकपूर्ती सोहळा सोसायटीच्या नाशिक कॅम्पसमध्ये १२ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. सोसायटीचे सचिव तथा महासंचालक सर डॉ. मो. स. गोसावी आणि सोसायटीच्या मानव संसाधन व्यवस्थापन संचालिका आणि एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. दीप्ती देशपांडे यांनी विविध कार्यक्रमांची माहिती शुक्रवारी पत्रकारांना दिली. Gokhale Education Society’s foundation hundred years ceremony starts Monday.

शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त नाशिक कॅम्पसमध्ये सोसायटीच्या वाटचालीचा मागोवा घेणारे ‘शतपट’ सचित्र प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. सोसायटीच्या स्थापनेपासून म्हणजे मुंबईच्या गिरणगावात सुरू केलेल्या पहिल्या शाळेपासून प्रत्येक शाळेची, महाविद्यालयाची आणि इतर विविध संस्थांची माहिती, विविध उपक्रम, संस्थापक टी. ए. कुलकर्णी, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, कुलकर्णी यांचे सुरुवातीचे सहकारी आचार्य भिसे, आचार्य दोंदे, चित्रे गुरुजी, सोसायटीचे विद्यमान सचिव सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या योगदानाची माहिती आणि विचारसंदेश इत्यादी विविध बाबींचा प्रदर्शनात समावेश आहे. १२ फेब्रुवारीपासून हे प्रदर्शन खुले करण्यात येणार आहे.

शतकपूर्ती आणि शिवजयंतीचे औचित्य साधून राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर १२ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांची दररोज सायंकाळी सहा वाजता व्याख्याने होतील.

प्रदर्शनांचे आयोजन

हंप्राठा कला, रायक्ष विज्ञान महाविद्यालय आणि आरएच सपट इंजीनियरिंग कॉलेजच्या वतीने १६ फेब्रुवारी पासून ‘विज्ञान-तंत्रज्ञान’ या विषयावर प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. नाशिकरोड महाविद्यालयाच्या वतीने शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन १९ फेब्रुवारी रोजी भरविण्यात येणार आहे.

विशेष व्याख्यान

दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य श्री. एस. बी. पंडित यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. सोसायटीच्या स्थापनेचा मागोवा आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखले, टी. ए. कुलकर्णी यांच्या जीवनकार्यावर प्राचार्य पंडित प्रकाशझोत टाकतील. या कार्यक्रमास उत्तर काशीचे शंकराचार्य जनार्दन स्वामीजी यांचा विशेष आशीर्वाद लाभणार आहे.

शतकपूर्ती सोहळ्यातील मुख्य कार्यक्रम १९ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सकाळी दहा वाजेपासून सुरु होणाऱ्या या मुख्य कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, सन्माननीय अतिथी म्हणून अणु-वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कीर्तनकार चारुदत्त आफळे, उत्तरकाशीचे स्वामी जनार्दनदासजी, पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे, लेखिका श्रीमती इंद्रायणी सावकार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोसायटीच्या शतकपूर्तीनिमित्त कॅम्पसमध्ये गुरुदक्षिणा सभागृहाची  कोनशिला मान्यवरांच्या हस्ते बसविण्यात येणार आहे. याचवेळी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिवकालीन शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिके सादर करण्यात येतील. समारंभात  विविध  प्रकाशने  करण्यात येतील.  ‘शतंजयी’ स्मरणिका, ‘झेनिथ'( महाविद्यालये), ‘गॅलंट'(शाळा), ‘स्वयंप्रकाश’ (संशोधन नियतकालिक), , ‘निबोधी’ ( सर डॉ. मो. स. गोसावी यांचे इंग्रजीतील आत्मचरित्र), ‘रिसोनन्स’, ‘स्पेक्ट्रम’, ‘अवबोध’, ‘सुसंवाद’ इत्यादींचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

शतकपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाचा समारोप माजी विद्यार्थ्यांच्या विशेष सत्कार सोहळ्याने होणार आहे. सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. आर. एम. कुलकर्णी (नाशिक), डॉ. सुहासिनी संत (मुंबई), प्रभाकर राऊत (पालघर) आदी सर्व पदाधिकारी या कार्यक्रमांच्या नियोजनाची धुरा सांभाळली आहे. विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी आदी कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

*********************************************************************

प्रसिद्धी पत्रक,निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा  तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.