गोदावरीला पहिला पुर; दुतोंडया मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी

यंदाच्या पावसाळ्यात गोदावरीला पहिल्यांदाच पूर आला असून दुतोंडया मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे. आज सोमवार (दि. 16) सकाळपासून गंगापूर धारण पाणलोट परिसरात पाऊस सुरू असल्याने पाणी सोडण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. Godavari first time flooded 2018 Nashik Rains gangapur dam position

नाशिक जिल्हात पश्चिम पट्ट्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पंचवटीतील रामकुंड परीसरात पुर स्थिति निर्माण झालीआहे. गाेदावरी व दारणा नदी काठावरच्या घरे गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Godavari first time flooded 2018 Nashik Rains gangapur dam position

#NashikOnWeb #गोदावरी पात्रातील #रामसेतू पूल पाण्याखाली… जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक EOC नियंत्रण कक्ष यांचे मार्फत
सर्व नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात येतो की,
दिनांक 16.07.2018 रोजी नाशिक जिल्ह्यातील खालील प्रमाणे धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. Godavari first time flooded 2018 Nashik Rains gangapur dam position

गंगापूर 4716 क्युसेक ,
दारणा 6602 क्युसेक ,
नांदूर मधमेश्वर 7210 क्युसेक,
चणकापूर 567 क्युसेक ,
पुनद 1198 क्युसेक ,
ठेंगोडा 871 क्युसेक

होळकर पूलाखालून 2438 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
नागरिकांनी पूर पाहण्यासाठी होळकर पुलावर गर्दी करू नये, पाण्यातून वाहने चालवू नये तसेच पाण्यात उतरण्याचा प्रयत्नही करू नये व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नये. Godavari first time flooded 2018 Nashik Rains gangapur dam position

Godavari first time flooded 2018 Nashik Rains gangapur dam position

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक .EOC मार्फत प्रसिध्द.
संपर्कासाठी क्रमांक टोल फ्री १०७७, ०२५३ – २३१७१५१ , २३१५०८० ,
शहर पोलीस नियंत्रण कक्ष २३०५२३३/३४/३८/, २३०५२०१, २३०५२००,२३०५२०५,
टोल फ्री १००,
ग्रामिण पोलीस नियंत्रण कक्ष २३०९७१५, २३०३०४४, २३०३०२१, २३०३०८८, २३०९७००,

नाशिक महानगर पालिका २२२२४१३, २५७१८७२, २५९०८७१, २५९२१०१, २५९२१०२,

टोल फ्री १०१, १०२ या क्रमांकावर नागरिकांनी आपत्ती बाबत माहितीसाठी संपर्क करावा.

Godavari first time flooded 2018 Nashik Rains gangapur dam position

Photo Credit : Mayur bargaje

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.