भीक मागण्यासाठी केले चिमुरडीचे अपहरण, दोघांना अटक

नाशिक : इगतपुरी रेल्वे स्थानकातून भीक मागण्यासाठी एक वर्षाच्या बालिकेचे अपहरण करणाऱ्या महिलेसह एका व्यक्तीला इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी गजाआड केले. याप्रकरणी इगतपुरी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Girl Kidnapped Begging rpf police arrests two kidnappers igatpuri nashik

या प्रकरणात सारिका गणेश झाल्टे (३०) ही महिला तिच्या सहा वर्षांचा मुलगा मुकेश व एक वर्षाची मुलगी सुषमा यांच्यावर क्षयरोगावर उपचारासाठी घोटी येथे जाण्यासाठी नाशिकरोड स्थानकातून ४ मे ला निघाली होती.

सकाळी ११ वाजता इगतपुरी स्थानकावर रेखा नावाच्या महिलेसह एका व्यक्तीची ओळख झाली. सारिकाला अशक्तपणा असल्याने ती प्लॅटफॉर्मवरच झोपली. तिच्यासोबत एक वर्षाची मुलगी सुषमादेखील होती. सारिका झोपेत असल्याचा फायदा घेऊन सुषमाला संशयित रेखा छोटू चव्हाण आणि  कृष्णा रमेश सोलंकी (३४) यांनी पळवून नेले. Girl Kidnapped Begging rpf police arrests two kidnappers igatpuri nashik

झोपेतून उठल्यानंतर सुषमा दिसत नसल्याने सारिकाने इगतपुरी लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव यांनी मनमाड, कल्याण, भुसावळ, शिर्डी, कोपरगाव या ठिकाणी पथके पाठवून तपास सुरू केला.

यात ९ मे ला कोपरगाव रेल्वेस्थानकात संशयित महिला रेखा व कृष्णा अपहरण केलेल्या मुलीचा भीक मागण्यासाठी वापर करत असल्याची माहिती मिळाली असता त्यांना अटक करण्यात आली. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, न्यायालयाने दोघांना १४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. Girl Kidnapped Begging rpf police arrests two kidnappers igatpuri nashik

दरम्यान, सुषमाची प्रकृती ठिक नसताना तिच्याकडून पाच दिवस भीक मागून घेतली. यामुळे तिची प्रकृती अधिक खालावली आहे.

इगतपुरी : रिसॉर्टमध्ये कथित पत्रकार संघटनेच्या अध्यक्षाचा बारबालांसह धिंगाणा; दहा ताब्यात

इगतपुरी : बिबट्यांची हत्या करत अवयवांची तस्करी करणारी टोळी जेरबंद

इगतपुरी : अज्ञात वाहनाची बिबट्याला धडक; जागीच मृत्यू

Girl Kidnapped Begging rpf police arrests two kidnappers igatpuri nashik

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi and your  name and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.