घोटी महामार्गावर तीन वाहनांचा अपघात,  संगमनेरच्या दम्पत्याचा मृत्यू

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर घोटी महामार्गावर पांढुर्ली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या घोरवड गावाच्या शिवारात तीन वाहनांचा अपघात झाला असून त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. सदरचा अपघात घाट उतरताना झाला आहे. सोमवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये संगमनेरचे रहिवासी असलेले दादा नामदेव घुले आणि मीना दादाभाऊ घुले या दांपत्याचा मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, घोरवड शिवारात रस्त्याच्याकडेला भाजी विक्रेत्यांचे स्टॉल आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनेक वाहने भाजी खरेदीसाठी थांबतात. अशा प्रकारे घाट उतरून घोटीकडे जाणाऱ्या ट्रकचालकाने अचानक आपल्या वाहनाचा वेग कमी केला.यात पाठीमागे असणारा टेम्पो त्यावर धडकला. मग टेम्पो मागे असलेल्या दुचाकीवरून घुले  दांपत्य जात होते. हे दांपत्य दुचाकीसह टेम्पोवर धडकून रस्तावर पडले. त्यापाठोपाठ चालणाऱ्या टँकरच्या चाकाखाली चिरडून दोघांचाही मृत्यू झाला.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.