भर वस्तीत आढळली भली मोठी घोरपड, तिला वाचवण्यात यश

Ghorpad nashik city urban

नेहमीच जंगलात तेही डोंगर करी कोपऱ्यात आढळणारी अत्यंत लाजाळू अशी घोरपड ही शहरातील भरवस्तीतील दुकानात आढळून आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. रेडक्रॉस चौकातील एका हार्डवेअरच्या दुकानात अडगळीच्या जागेत सुमारे दीड फूट लांबीची घोरपड हे वन्यजीव सापडले. 

बुधवारी (दि.२५) वनविभागाचे कर्मचारी व वन्यजीवप्रेमींनी घोरपडला सुरक्षित वाचवले आहे.  शहराच्या मध्यवर्ती भागात वन्यजीव येण्याचे प्रमाण अलिकडे वाढताना दिसत आहे. बिबट्या हा नाशिक परिसरात हमखास दिसणारा वन्य प्राणी आहे. मात्र घोरपड दिसल्याने कुतूहल निर्माण झाले. 

आठवडाभरापूर्वी चार वानर शहराच्या पंचवटी भागातील फुलेनगर परिसरात भटकंती करताना आढळून आले होते. महिनाभरापुर्वी शरणपूररोड येथील एका व्यावसायिक संकुलाच्या तळ मजल्यातून घोरपडीचे लहान पिल्लू वन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता पुर्ण वाढ झालेली मोठी वयस्क  घोरपड एका हार्डवेअरच्या दुकानातून वाचवण्यात आली आहे.

 या  दुकानदाराने वनविभागाशी संपर्क साधून घोरपड असल्याची माहिती कळविली. त्यानंतर तत्काळ पश्चिम नाशिकचे वन परिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, राजेंद्र ठाकरे, इको-एको वन्यजीवप्रेमी संघटनेचे वैभव कुलकर्णी, सुखदा गायधनी आदिंनी हार्डवेअरच्या दुकानात पोहचून घोरपड सुरक्षितपणे ताब्यात घेतली. घोरपड संपुर्णत: तंदरूस्त असल्यामुळे तिला तत्काळ सायंकाळी नैसर्गिक अधिवासात वन कर्मचाऱ्यांकडून मुक्त करण्यात आले.

जॉईन करा आमचा WhatsApp ग्रुप : – NashikOnWeb 4 https://chat.whatsapp.com/JinYvQfCHIJLarUMwZiOw6

Ghorpad nashik city urban

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.