Geeta Mali Accident सीसीटीव्ही फुटेज, घात की अपघात? Video

प्रसिद्ध गायिका आणि नाशिकच्या रहिवासी गीता माळी या प्रवास करत असलेली  कार गॅस टँकरला धडकल्याने  अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. त्यामध्ये हा अपघात किती भयानक झाला हे दिसून येतो आहे. Geeta Mali Accident

मात्र अपघाताच्या या फुटेज मध्ये जो घटना क्रम घडतो आहे, त्यामुळे अनेक मोठे प्रश्न उभे राहिले आहे. हा संपूर्ण व्हिडियो जिल्ह्यात जोरदार व्हायरल झाला आहे.

गीता या मुंबईहून नाशिककडे प्रवास करत होत्ये,  त्याच वेळी  शहापूर येथे रस्त्याच्या बाजूला गॅस टँकर क्र. (MH-48 AY 4756) हा  थांबला होता. त्या टँकरला माळी यांची कार (MH02 DJ 6488) मागून जबरदस्त वेगात  धडकली होती, यामध्ये माळी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (ता.14) दुपारी झाला.

या अपघातात त्यांचे पती अॅड. विजय माळी जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माळी यांच्या अपघाती निधनामुळे कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मात्र अपघात जेव्हा झाला तेव्हा यातील चालक उठून बाहेर येतांना दिसत आहे. त्यामुळे नेमके गाडीत किती लोक होते, गाडी कोण चालवत होते व गाडी मुद्दामून तर धडकवली नाही ना असे अनेक प्रश्न उभे केले आहेत. Geeta Mali Accident

स्वर्गीय गीता माळी यांचा अपघाताचे व्हायरल सीसीटीव्ही फुटेज …. कृपया व्हिडियो पाहतांना आपल्या विवेकाचा उपयोग करावा #Nashikonweb #Geeta_Mali

Nashik On Web ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ನವೆಂಬರ್ 18, 2019
आमचे फेसबुक पेज लाईक करा , व्हिडियो शेअर करा
Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “Geeta Mali Accident सीसीटीव्ही फुटेज, घात की अपघात? Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.