गंगापूर रोड पार्सल घेऊन बसले, चिंग झाले डोक्यात दगड टाकून केला मित्राचा खून

नाशिक : आनंदवली शिवारातील वापरात नसलेल्या एका निर्जन इमारतीत एकत्र येत दोघा मित्रांनी पार्सल घेऊन मनसोक्त दारू प्याले  . यावेळी दोघांमध्ये जुन्या काही कारणांवरुन भांडण सुरू झाले,डोक्यात दारू चढल्याने यावेळी एकाने मोठा दगड उचलून दुसऱ्याच्या डोक्यात टाकून ठार मारल्याची घटना मंगळवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास घडली आहे. मात्र यानंतर मद्यपी संशयिताने खूनाची कबुली देत स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले.Gangapur Road

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगापूररोडवरील एका वाइन शॉपमधून मंगळवारी संशयित आरोपी रुपेश छोटुलाल यादव (३६,रा.शिवशक्ती चौक, सिडको) याने त्याचा मित्र महेश विष्णू लायरे (२९,रा. दत्तनगर, चुंचाळे) याच्यासोबत दारूचे पार्सल घेतले. मग पार्टी कोठे करायची? यावर खल करत आनंदवली शिवारातील गंगापूर रोड लगत वापरात नसलेल्या निर्जन इमारतीत दोघेही जाऊन दारू पित बसले. तेथे दोघा मित्रांनी सोबत मद्य रिचविले. मद्याची नशा झिंगल्यानंतर दोघांनी एकमेकांची कुरापत काढून भांडण सुरू केले. या भांडणाचे पर्यावसन जबर हाणामारीत झाले. यावेळी संशयित रुपेश याने मनात राग धरुन त्याच्यासोबत बसलेल्या महेशच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्यास ठार मारले.

यानंतर रुपेशने इमारतीतून बाहेर पडत तेथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका नागरिकाला स्वत:केलेल्या गुन्ह्याबाबत सांगितले. त्या नागरिकाने त्यास धरुन ठेवत तत्काळ गंगापूर पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल हे पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित संशयित रुपेश यास पोलीस वाहनात डांबले. तसेच इमारतीत अंधारात पडलेला मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा करत शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविला. याप्रकरणी संशयिताविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.Gangapur Road

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.