गंगाघाटावर भरधाव कारने एकाला चिरडले भाविकाचा मृत्यू

नाशिक : गंगा घाटावर मध्य रात्री नंतर भरधाव कारने म्हसोबा पटांगण यथे झोपलेल्या भाविकाला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार 12 जानेवारी, 2018 रोजी घडला आहे. मात्र तक्रार उशिराने दाखल करण्यात आली आहे. या अपघातात वृध्द भाविक जागीच ठार झाला आहे. या भाविकाचे नाव भुराराम आसरे आरख (खंगार) (69, रा. मु.मरौली, पो. अछरोड, ता.जि.बांदा, उत्तरप्रदेश) असे आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ganga ghat hit run case car brutally killed sleeping old man midnight 

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून रामबाबू आरख त्यांच्या परिवारासह देवदर्शनासाठी नाशिकमध्ये आले होते. देवदर्शन केल्यानंतर गंगाघाटावर रात्री ते म्हसोबा पटांगणावर झोपले.

यावेळी अज्ञात वाहनचालकाने (एम.एच.15, एफ.टी.2553) दुर्लक्ष करत भरधाव  वेगाने कार चालवत पहाटे चार वाजेच्या सुमारास भुराराम आसरे आरख यांच्या अंगावरुन वेगात गाडी नेली. आरख यांच्या दोन्ही पाय व छातीवरुन बेदरकारपणे गाडी गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आरख यांचा मुलगा रामबाबू याने उशिराने म्हणजे गुरुवार ( दि. १२ एप्रिल) पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानूसार पोलिसांनी वरील क्रमाकांच्या वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरिक्षक पी.पी.मुंढे घटनेचा तपास करत आहेत.

ganga ghat hit run case car brutally killed sleeping old man midnight

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.