गँग रेप : आरोपीना २० वर्षे सश्रम करावास, आर्थिक दंड

चार वर्षापूर्वी धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी गेलेल्या प्रियकर प्रेयसीस अडवून प्रियकराला जीवे मारण्याची धमकी देत ,  बेदम मारहाण करत त्याच्या प्रेयसीवर शेतामध्ये गँग रेप करण्यात आला होता. हा सर्व संतापजनक प्रकार रोकडोबावाडी परिसरात चार वर्षांपूर्वी घडला होता. गुन्ह्यातील एकूण सहा संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावली असून,  बलात्कारप्रकरणी दोषी आढळलेल्या तिघांना वीस वर्षे सक्तमजुरी . आर्थिक दंड, तर मारहाण करणाऱ्या तिघांना सहा महिने कारावास व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

देवळालीगावाजवळील रोकडोबावाडी परिसरात एका २४ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्काराची घटना २६ फेब्रुवारी २०१४ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली होती. त्यावेळी उपनगर पोलीस स्टेशन येथील तत्कालीन महिला उपनिरीक्षक मीना एस. बकाल यांनी संशयितांचा शोध घेऊन त्यांना अटक करत न्यायालयापुढे हजर केले.

पोलीस ठाण्यात बलात्कार, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न आदी कलमान्वये दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होता. गुन्ह्याचे सबळ पुरावे बकाल यांनी न्यायालयाला दिले होते.खटला न्यायालयात सुरू असताना गुरुवारी (दि.१७) जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी साक्षीदारांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे

१,जग्गू प्रदीप वानखेडे, २.केरू ऊर्फ प्रमोद सीताराम गरुड, ३. तुषार ऊर्फ खुशा भगवान भदरंगे तिघा नराधमांना (सर्व रा. रोकडोबावाडी) न्यायालयाने दोषी तिघांना २० वर्षे सश्रम करावास प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तर मारहाण केलेल्या विजय उगले, कैलास बाराहाते, अनिल सदाशिव, दीपक ढोके या आरोपींना सहा महिन्यांचा सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजाराचा दंड सुनावला आहे. सरकार पक्षाकडून अ‍ॅड. गायत्री पटणाला, पंकज चंद्रकोर यांनी युक्तिवाद केला.

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi Your Name and city  and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.