gang rape नाशिककर हादरले १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार,

गोरगरीब कुटुंबातील एका तेरावर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा संशयितांनी मिळून सामुहिकरित्या अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड भागातील अरिंगळे मळा परिसरात घडली. रविवारी (दि.१०) घटना समोर आल्याने नाशिककर हादरले. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालून एका संशयित महिलेसह पाच युवक आणि एका विधीसंघर्षित बालकाला अटक केली आहे. याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन नाशिकरोड पोलीस ठाण्यात एकुण सात संशयित आरोपींविरुध्द बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नराधमांनी १३ वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवून हे संतापजनक कृत्य केलं आहे.gang rape

धक्कादायक बाब पीडितेवर आठवडाभरापूर्वी सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली आहे याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवून विधीसंघर्षित बालकासह सात जणांना अटक केली. संशयितांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

आईने दिलेल्या तक्रारीवरून

या संदर्भात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेचे आई-वडील मजुरी करतात. ते कामावर गेले असताना ही घटना घडली. सायंकाळी ते परतल्यानंतर १३ वर्षाची मुलगी घरात दिसली नाही. पालकांनी तिची शोधाशोध सुरू केली. त्यावेळी पीडिता भयभीत अवस्थेत आढळून आली.

विधीसंघर्षित मुलाला अटक

पोलिसांनी रात्रीच संशयित दीपक खरात (१९, सिन्नर फाटा), रवि कुऱ्हाडे (१९, पांडवलेणी), आकाश गायकवाड (२४, रेल्वे मालधक्का), सुनील कोळे (२४, जेलरोड) यांना तर, पहाटे सोमनाथ खरात (१९, मालधक्का रोड, नाशिकरोड) आणि पूजा वाघ (२७) यांच्यासह एका विधीसंघर्षित मुलाला अटक केली.

सविस्तर वृत्त :-

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील अरिंगळे मळा या भागात एकुण सहा संशयितांनी मिळून एका १४ ते १६ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुलीवर सामुहिकरित्या अत्याचार केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी उशिरा घडली. याप्रकरणी पिडितेने तिच्या आईकडे याबाबत सांगितले असता रात्रीच्या सुमारास आईने नाशिकरोड पोलिसांकडे धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. यानुसार पोलीस उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरज बिजली यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करुन पथकाला त्यांच्या शोधात रवाना केले.

मध्यरात्री उशिरापर्यंत पोलिसांनी एका अल्पवयीन संशयित मुलासह महिला व अन्य पाच युवकांना ताब्यात घेतले आहे. त्यांना आज सकाळी न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. पिडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन या घटनेचा सखोल तपास सुरु असल्याचे खरात यांनी सांगितले. सर्व संशयितांना न्यायालयाने येत्या शनिवारपर्यंत (दि.१६्) पोलीस कोठडी सुनावली आहे.gang rape

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.