भद्रकालीतील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा, सहा ताब्यात

भद्रकालीतील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा टाकला असून पोलिसांनी  सहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये जप्त केले आहे. हा जुगार अड्डा एका लॉज मध्ये सुरु होता.बसेरा लॉजच्या ३०८ रुमनंबरमध्ये छापा टाकला असता संशयित बापू (संजय) दौलत देवरे, अण्णा रंगनाथ अहिरे, प्रशांत धुडा परमार, उमेश गोपाल भंडारी, धनंजय बबन टर्ले, उमेश संजीव शेट्टी हे सहा जण ताब्यात घेतले आहे.  gambling police raid nashik bhdrkali lodge 6 arrested 

तिर्रट नावाचा जुगार खेळत पैसे लावले जात होते. जुगाराचे साहित्य व साधनांसह एक लाख १४ हजार ६४० रुपये रोख, व ४९ हजार रुपयांचे मोबाईल असा एक लाख ६३ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़.  पोलीस उपनिरीक्षक पालकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक जाकिर शेख, पोपट कारवाळ, पोलीस हवालदार संजय मुळक, आदींनी  ही कारवाई केली आहे. gambling police raid nashik bhdrkali lodge 6 arrested 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.