अँमो परिषद : वेळीच काळजी घेतल्यास कमी खर्चात कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो

चौथ्या राज्यस्तरीय अँमो परिषदेचा समारोप

नाशिक : आपल्या देशात कर्करोगाचे रुग्ण हे अन्य देशांपेक्षा वेगळे आहेत. भारतात अमेरिकेपेक्षा वेगळ्या कारणांनी कर्करोग ग्रस्त झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. तिकडे तंबाखू अथवा गुटखा खाल्ला जात नाही. त्याचप्रमाणे भारतात कर्करोगाचे निदान चौथ्या टप्प्यात होणारे निदानाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रुग्ण दगावण्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे अमेरिकन पद्धतीने भारतात कर्करोग उपचार करणे किती योग्य आणि त्यात काय बदल करणे अपेक्षित आहे यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे डॉ. चंद्रशेखर पेठे यांनी सांगितले. Fourth AMMO Conference 2018 Nashik Cancer Oncology Early Care

नाशिक शहरात हॉटेल गेटवे येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय चौथ्या राज्यस्तरीय अँमो परिषदेच्या समारोप प्रसंगी आभार व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी डॉ. शैलेश बोंदार्डे, डॉ. पूर्वेश पारीख, डॉ. गोविंद बाबू, अँमोचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी डोक्याचा आणि मानेचा कर्करोग तसेच गर्भाशय आणि अंडाशयाच्या कर्करोगावर चर्चा, परिसंवाद घेण्यात आले. डोक्याचा आणि मानेचा कर्करोग हा मुख्यत्वे गुटखा, तंबाखू, बिडी, सिगारेट, दारू सेवन केल्याने होतो. भारतात ग्रामीण भागात मिस्री वापरणाऱ्या स्रियांमध्येही मोठ्या प्रमाणात हा कर्करोग आढळतो आहे. मात्र न्यूनगंड असल्याने किंवा सांगायची भीती वाटणे यामुळे कान्सारचे निदान उशिरा होण्याचे प्रमाण भारतात जास्त आहे.

अमेरिकेत ९५% कॅन्सर पहिल्या टप्प्यातच निदान होऊन उपचार सुरु केले जातात. मात्र भारतात शेवटच्या टप्प्यात निदान होण्याचे प्रमाण ८०% हून जास्त आहे. त्यामुळे सकारात्मक निकालांची संख्या भारता कमी आढळते आणि दोष भारतात उपलब्ध तंत्रज्ञानाला दिला जातो. या झालेल्या झालेल्या चर्चेत कर्करोग तज्ञांनी कर्करोगाचे निदान लवकर होण्यासाठी असलेल्या चाचण्यांबाबत जनजागृती आवश्यक असल्याचे सांगितले. Fourth AMMO Conference 2018 Nashik Cancer Oncology Early Care

डोक्याच्या आणि मानेच्या कर्करोगात वेळोवेळी शारीरिक चाचण्या करणे आवश्यक आहे. योग्य रुग्णाला योग्य डोस वापरून केमोथेरपी आणि अन्य उपचार करण्याच्या पद्धतीचा अवलंब होण्याची सुरुवात झाली असून रुग्ण शिक्षक असेल तर त्याचा घशावर परिणाम होऊ न देता उपचार करणे, मजूर असल्यास त्याचा शक्ती क्षय कमी होण्याकडे लक्ष देणे अशा मुद्द्यावर चर्चा आणि परिसंवादात जोर राहिला. प्रत्येक रुग्णाला वैयक्तिक उपचार देण्याकडे लक्ष वेधण्यात आले.

गर्भाशयाचा आणि अंडाशयाचा कर्करोग टाळता येण्यासारखा नसला तरी न दुखणाऱ्या गाठीकडे वेळीच लक्ष देऊन आणि इतर गोष्टींचा स्वीकार करून लवकर निदान झाल्यास कर्करोग आटोक्यात आणणे शक्य आहे. त्यासाठी स्क्रीनिंग, विविध लसीकरण सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध आहेत. त्याबाबत जनजागृती होऊन रुग्णाला दिलासा मिळणे आवश्यक असल्याबाबत चर्चा झाली. Fourth AMMO Conference 2018 Nashik Cancer Oncology Early Care

नाशिकमध्ये प्रथमच राज्यस्तरीय कॅन्सर संबंधित तज्ञांची परिषदेचे आयोजन करण्यात आल्याने नाशिक शहर सुयोग्य वातावरणासह महाराष्ट्रातील कॅन्सर उपचारांसाठीचे महत्वाचे स्थान निर्माण करणार आहे. या परिषदेचे नाशिकमध्ये आयोजन करून डॉ. बोंदार्डे या कर्करोग तज्ञाने हे महत्व अधिकच अधोरेखित केले आहे.

कर्करोग उपचार व निदान करण्याचे नवे तंत्रज्ञान आता उपलब्ध असून स्त्रियांसाठी गर्भाशय आणि अंडाशायाच्या कर्करोगासाठी स्क्रीनिंग, विविध लसीकरण सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध आहेत. या सुविधांचा लाभ लाभ घेऊन याबाबत जास्तीतजास्त जनजागृती व्हावी यासाठी पर्यटन करण्याबाबत परिषदेत उहापोह करण्यात आला. नाशिकच्या आदिवासी भागात विविध तपासणी शिबिरे आयोजीईत करण्याबाबतचा निर्णयही घेण्यात आला आहे. – डॉ. शैलेश बोंदार्डे

Press Release : Fourth AMMO Conference 2018 Nashik Cancer Oncology Early Care, an association of medical oncologists
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.