Five Judges अयोध्या प्रकरणातील आहेत हे पाच न्यायाधीश, त्यांची पूर्ण माहिती ?

अयोध्या येथील जागा वाद प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा असा निर्णय दिला आहे. त्यानुसार आता त्या ठिकाणी राम मंदिर उभे रहणार आहे. मात्र हा निर्णय देतांना कोण न्यायाधीश होते हे आपल्याला माहित आहे का ? Five Judges

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली असेलेल्या ५ न्यायाधीशांच्या पीठाने हा निर्णय दिला असून, गोगोई यांच्या व्यतिरिक्त, न्यायाधीश एस. एस. बोबडे, न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायाधीश अशोक भूषण आणि न्यायाधीश एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई

सरन्यायाधीश रंजन गोगोई १८ नोव्हेंबर १९५४ रोजी जन्मलेले असून ते १९७८ मध्ये बार काउंसिलमध्ये सहभागी झाल होते . तर गुवाहाटी हायकोर्टात वकिली सुरू केली. त्यांनी २८ फेब्रुवारी २००१ मध्ये ते गुवाहाटी हायकोर्टाचे न्यायाधीश बनले. १२ फेब्रुवारी २०११ या दिवशी ते पंजाब हरयाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश झाले आणि सन २०१२ मध्ये ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बनले. या नंतर सन २०१८ मध्ये त्यांची नियुक्ती सरन्यायाधीशपदी झाली.

न्यायाधीश एस. ए. बोबडे

एस. ए. बोबडे सन १९५६ मध्ये जन्मलेले आहेत. ते १९७८ मध्ये ते बार काउंसिलचे सदस्य झाले आणि नंतर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात वकिली सुरू केली. पुढे २०१० मध्ये ते मुंबई हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश बनले. तर ते सन २०१३ मध्ये ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बनले आहेत.

न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड

दिल्लीतील सेंट स्टीफन महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी घेतली आणि दिल्ली विद्यापीठातून एलएलबीची पदवी घेतली. चंद्रचूड हे १३ मे २०१६ मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बनले. त्यांनी मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले असून सोबतच सन १९९९ मध्ये भारताचे एसएजी म्हणूनही देखील काम केले आहे.

न्यायाधीश अशोक भूषण


उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये ५ जुलै १९५६ रोजी यांचा जन्म झाला आणि आलाहाबाद विद्यापीठातून बीए आणि एलएलबी झाले. सन १९७९ मध्ये ते बार काउंसिलचे सदस्य बनले होते. सन २००१ मध्ये ते आलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश बनले. सन २०१५ मध्ये त्यांची केरळ हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. १३ मे २०१६ मध्ये ते सु्प्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले आहेत.

न्यायाधीश एस. ए. नजीर

एस. ए. नजीर हे सन १९५८ मध्ये जन्मले असून, कर्नाटक हायकोर्टात सन १९८३ मध्ये वकिली सुरूवात केली. सन २००४ मध्ये ते न्यायाधीश बनले. सन २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टात त्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती केली गेली आहे. Five Judges

बातमी वाचायला लिंक क्लिक करा !
Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “Five Judges अयोध्या प्रकरणातील आहेत हे पाच न्यायाधीश, त्यांची पूर्ण माहिती ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.