विश्वास ठाकूर यांना ‘फर्स्ट जनरेशन इनोव्हेशन बिझिनेस अवार्ड-2018’ प्रदान

नाशिक : सहकार बँकींग क्षेत्रातील वैशिष्ठपूर्ण कार्याबद्दल ‘फर्स्ट जनरेशन इनोव्हेशन बिझिनेस अवार्ड-2018’ विश्वास को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांना प्रदान करण्यात आला आहे.

रिटेल इन ठाणे या संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या मान्यवरांना दरवर्षी सन्मानित करण्यात येते. ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या शानदार समारंभात भूमी असोसिएट्सचे संचालक नानजीभाई पटेल यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बँकेने वैशिष्ट्यपूर्ण कार्यप्रणालीने ठसा उमटवला आहे. आणि सहकार संस्थांच्या नव्या आधुनिक नव्या पर्वाची सुरूवात केली आहे. त्यात विश्वास ठाकूर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सहकारी संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता आणणे व गुणात्मक मूल्य वाढविल्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे याबद्दल त्यांना ‘फर्स्ट जनरेशन इनोव्हेशन बिझिनेस अवार्ड-2018’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. समाजात ध्येयनिष्ठेने, मेहनतीने आपल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या कर्तबगार व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

सत्काराला उत्तर देतांना विश्वास ठाकूर म्हणाले की, ‘सहकार क्षेत्र हे सर्वसामान्यांना आर्थिक पत देणारे क्षेत्र आहे. त्यामाध्यमातून त्यांचे जगणे समृद्ध होण्यासाठी मदतच झाली आहे. जागतिकीकरणाच्या काळातही सहकार क्षेत्राने व्यावसायीकतेच्या स्पर्धेमध्ये स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. माझा सन्मान हा सहकार चळवळीचाच सन्मान आहे.  याप्रसंगी रिटेल इन ठाणेचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे, दिपेश मोरे, शिवानी बैसाणे, श्रद्धा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.