गंजमाळ येथे भर दुपारी आग, महिलेचा जळून मृत्यू

शहरातील मध्यवर्ती भागातील गंजमाळ परिसारत भर दुपारी भीषण आग लागली होती. ही आग पंचशील येथे लागली होती. आगीत तरुण महिला जळून मरण पावली आहे. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. आगीच्या भक्ष्य स्थानी इतरही झोपड्या जळाल्या आहेत.

आगीत सुनीता जटाळे वय अंदाजे 27 ही आगीत जळाल्याने मृत्य झाला आहे.  सुनीता या कालच  आत्याच्या भागूबाई आव्हाड घरी आल्या होत्या,. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी घटनेची नोंद केली असू, काही घातपात नाही ना यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी आधिक तपास करीत आहे. दुपारी एक वाजेदरम्यान लागलेल्या या आगीमुळे शेजारील तीन घरे देखील खाक झाली आहेत. आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात भीतिचे वातावरण पसरले होते. जागरूक तरुणांनी वेळीच आगीची माहिती अग्निशमन दलाला व पोलिसांना दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या चार बंबांच्या साह्याने साधारणतः दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

(

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.