ठाकरे यांची संपत्ती शोधण्याची वेळ आली आहे – दानवे

उद्धव ठाकरे यांची संपत्ती शोधण्याची वेळ आली आहे – दानवे
नाशिक : महापालिका प्रचारा दरम्यान संपत्ती जाहीर करण्याच्या भाजप शिवसेना याच्यातील आरोप प्रत्यारोप अद्यापही सुरु आहे. अमित शाहांनी संपत्ती निवडणूक आयोगाच्या वेबसाईट जाहीर आहे. तुमची शोधायची कुठे?, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. तुमची संपत्ती किती आहे आणि ती कुठे ठेवली आहे असा सवालही दानवे यांनी विचारला आहे. शुक्रवारी नाशिकमध्ये झालेल्या प्रचार सभेत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेने सोबतच कॉंग्रेसवर टीका केली. सोबतच खोत यांना पक्षात घेण्यासंदर्भात कोणताही विचार नसून पक्षाला अशी गरज नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
काँग्रेस आणि शिवसेनेची छुपी युती आहे. भाजपच्या यशाने शिवसेनेचे पोट दुखत आहे. भ्रष्ट देशाचा पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंह यांची जागतिक पातळीवर ओळख होती. परदेशात कुणी त्यांना ओळखतही नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही ओळख बदलली, त्यांच्या स्वागताला थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा विमानतळावर यायचे असे म्हणत काँग्रेसवर टीका केली आहे.
मराठवाड्याला पाणी सोडण्यावरुनही शिवसेनेची दुटप्पी भूमिका असल्याचं दानवे म्हणाले. शिवाय 1400 कोटी रुपये खर्च करुन आम्ही 24 टीएमसी पाणी अडवलं, तर काँग्रेसने हेच काम 5 हजार कोटी रुपये खर्च करून, शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊनही 8 वर्षात पूर्ण केलं नाही असे सांगितले.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.