विंचूर येथील शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक; फसवणुकीचे आणखी एक प्रकरण

लासलगाव : (वार्ताहर समीर पठाण) ढोकेश्वर मल्टीस्टेटस पतसंस्था आणि हरी ओम ग्रुप आणि मागील महिन्यात सीट्रस चेक इन्स व रॉयल ट्विन्कल स्टार या कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आज शुक्रवार दि. १३ रोजी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. Financial fraud Vinchur farmer double money scheme

दाम दुपटीचे आमिष दाखवून ५४ लाखांची फसवणूक विंचूर येथील रवींद्र मल्हारी दरेकर (४२) या शेतकऱ्याची झाली आहे. याबद्दल लासलगाव पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या फिर्यादीनुसार, प्रवीण वरगुडे, राजेंद्र जेजुरकर रा. संवत्सर, ता. कोपरगाव, दिगंबर बैरागी रा. पिंपळगाव लेप, ता. येवला, सुनील गायकवाड रा. विंचूर, ता. निफाड,भाऊसाहेब बडवर, रा. वाकद, ता. निफाड यांनी कोपरगाव येथे व्हिनस कॅपिटल सर्व्हिसेस या कंपनीत दोन वर्षात गुंतवणूक केलेली रक्कम दामदुप्पट करण्याची योजना आणली होती. अनेकांना हे स्वप्न त्यांनी दाखवले होते.

यात दरेकर यांच्याकडे वरील तीघानी फिर्यादीचा भाऊ सुभाष मल्हारी दरेकर यांच्या ओळखीचा फायदा घेत रवींद्र दरेकर यांना पैसे गुंतवायला सांगितले. 8/7/15 ते 17/8/15 या दरम्यान ही प्रक्रिया झाल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. दरेकर यांचे 54 लाख रु. गुंतवणूक करून घेतले व त्यांचा विश्वासघात केला असे फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानुसार लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये वरील तीनही लोकांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Financial fraud Vinchur farmer double money scheme
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.