आयुक्त तुकाराम मुंढे माध्यमांकडे बोलू नका , राज्य सचिव यांच्याकडे लेखी तक्रार

नाशिक : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे सध्या नाशिकमध्ये सर्वाधिक चर्चिले जाणारे नाव आहे. त्यांच्यावर नाराज सत्ताधारी नगरसेवकांनी अविश्वास ठराव प्रस्ताव आणत आहेत. मात्र यावेळी तुकाराम मुंढे यांना माध्यमांनी त्यांची बाजू विचारली, तेव्हा विविध वाहिन्या आणि वृत्तपत्रांनी त्यांच्या मुलाखती व प्रतिक्रिया घेतल्या, मुंढे माध्यमांत बोलून अप्रत्यक्ष पणे लोकप्रतिनिधींवर टीका करत असून त्यामुळे जनमानसात प्रतिमा मलीन होत आहे असे सांगत, माध्यमातून मुंढे यांच्या मुलाखतीला आक्षेप घेण्यात आला असून यासंदर्भात राज्यशासनाच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करण्यात आली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.file written complain against tukaram mundhe state secretary  nashik news

सत्तधारी भाजपाच्या पुढाकाराने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरूध्द अविश्वास ठराव आणण्यात आला असून १ सप्टेंबर रोजी विशेष महासभा बोलवली आहे. मात्र  अनेक वृत्त वाहिन्यांना मुलाखत देताना तुकाराम मुंढे आपली बाजु मांडत समजून सांगत  आहेत.असे मुलखत देतांना नगरसेवकांवर अप्रत्यक्षरीत्या टीका होत असून त्यांच्या हेतुविषयी शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सातपूरच्या शिवाजी नगर भागातील रवी संपत पाटील या कार्यकर्त्याने थेट राज्याच्या सचिवांकडे तक्रार केलीय.मुंढे देत असलेल्या मुलाखती म्हणजे नागरी सेवा नियम (शिस्त व अपिल) नियम १९७९ नुसार अशाप्रकारे कोणत्याही अधिकाऱ्याला अशाप्रकारे आपली भूमिका जाहिर करण्याचा अधिकार आहे काय असा प्रश्न उपस्थित केला आहे.file written complain against tukaram mundhe state secretary  nashik news

संबंधीत अधिकारी प्रशासकिय सेवेतील असल्याने त्यांना वर्तवणूकीसंदर्भात अस्तित्वात असलेल्या अन्य कोणत्याही नियमाने अशी जाहिररीत्या भूमिका घेणे आणि व लोकप्रतिनिधीस प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हेत्वारोप करण्याचे स्वातंत्र्य करण्याचे स्वातंत्र्य आहे काय ? याचा खुलासा करून कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. त्यामुळे आता राज्य शासन नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष आहे.

नागरिक एकत्र ३१ ऑगस्ट रोजी मोर्चा

नाशिकचे नागरिक मुंढे यांचे समर्थन करत असून, चांगला अधिकारी आम्हाला गमवायचा नाही अशी भूमिका घेतली आहे. नागरिकांनी एकत्र येत आम्ही नाशिककर अंतर्गत मनपा नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या विरोधात, ३१ ऑगस्ट रोजी मोर्चाचे आंदोलन करणार आहे. हे आंदोलन मोठे व्हावे व्हॉट्स अॅप वर अनेक ग्रुप तयार केले असून वॉक फॉर कमिशनर असे  ब्रीद घेवून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. तर मोर्चात सहभाग नोदवा म्हणून फेसबुक आणि तर सोशल मिडीयावर आंदोलन सुरु झाले आहे. तर यामध्ये मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना टॅग करत मुंढे याची बदली थांबवा अशी मागणी करण्यात येत आहे. file written complain against tukaram mundhe state secretary  nashik news

( सूचना : बातमी करिता वापरलेला फोटो हा सोशल मिडीयावरील असून, नागरिकांच्या या प्रतिक्रिया आहे. Nashikonweb याबाबत कोणतेही समर्थन अथवा विरोध करत नसून, माध्यम म्हणून ती प्रसिद्ध करत आहे. कृपया वाचकांनी याची नोंद घ्यावी.)

file written complain against tukaram mundhe state secretary  nashik news
Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “आयुक्त तुकाराम मुंढे माध्यमांकडे बोलू नका , राज्य सचिव यांच्याकडे लेखी तक्रार

  1. म्हणजे काय मुंढे ने आपली बाजूच नाही मांडायची? हे लोकतंत्र आहे प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. बाकीच्यांनी नंगानाच केलेला चालतो आणि ह्यांनी खरे सांगणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन वा रे माणसा…..अजब तुमचा न्याय निवाडा????

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.