मुंढेंच्या बदलीनंतर फटाक्यांची आतिषबाजी; महापौरांवर गुन्हा दाखल करण्याची आम्ही नाशिककरांची मागणी

गुरुवारी (दि. 22) तुकाराम मुंढे यांना नाशिक मनपा आयुक्त पदावरून मंत्रालयात नियोजन विभागाच्या सहसचिव पदी बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या शासकीय निवासस्थान रामायण बंगल्यासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली होती. त्यावरून संपूर्ण शहरातील विविध स्तरावरून नाराजीचा सूर उमटून अनेकांनी संतापही व्यक्त केला होता.  file case against nashik mayor amhi nashikkar mundhe transfer consecution

file case against nashik mayor amhi nashikkar mundhe transfer consecution nivedan

त्याला अनुसरून याबाबत विविध माध्यमांत आलेल्या बातम्यांचा आधार घेत आम्ही नाशिककर या संस्थेने नाशिक महापौर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर दिवसा फटके फोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर समाधान भारतीय, अनिल भडांगे, विनायक येवले, योगेश कापसे, दत्तू बोडके आदींच्या सह्या आहेत.

मुंढे यांचे समर्थक मनपात घुसले सुरक्षा कंत्राट रद्द , बदलीने नागरिक सोडून सर्व खुश, फोडले फटाके

सरकारवाडा पोलिसांनी येत्या तासाभरात दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करू असे आश्वस दिल्याचा दावा आम्ही नाशिककरने केला आहे.

file case against nashik mayor amhi nashikkar mundhe transfer consecution
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.