Fastag टोल भरता येणारे फास्टॅग म्हणजे काय, तो कसा , कुठे मिळेल?

देशभरात फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली केली जाणार आहे. फास्टॅग हे एक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस आहे. याच फास्टॅगच्या मदतीने आता टोल भरायचा आहे. एक डिसेंबर 2019 पासून कोणत्याही टोलनात्यावर कॅशमध्ये टोल वसूल केला जाणार नाही. (fastag)

गाडीला फास्टॅग नसेल त्यांना टोल जास्त द्यावा लागणार
तसेच टोल वर न जाणाऱ्या वाहनांना सुद्धा FASTAG आवश्यक आहे, इंधन मानके आणि सुरक्षित वाहन मालकी इत्यादी कलमांच्या पालनासाठी FASTAG आवश्यक आहे. शाळेच्या वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना हे आवश्यक आहे अथवा शालेय संस्थेवर कारवाई होऊ शकते.

फास्टॅग म्हणजे काय ???

सोप्या भाषेत सांगायचे म्हणले तर मोबाईलला जसे सीम कार्ड आहे आणि जेवढा तुम्ही रिचार्ज करणार तेवढा वेळ तुम्ही बोलू शकता; तसेच ” FASTAG – फास्टॅग ” एक चिप असते जी तुमच्या कारच्या समोरील काचेच्या आतून लावतात आणि त्याच्यावर केलेल्या रिचार्ज चा वापर करून तुम्ही टोल नाक्यावरून जाऊ शकता. त्या करिता रांगेत थांबण्याची किंवा रोख पैसे देण्याची गरज नाही.

फास्टॅग ही सध्या भारतात प्रचलित असलेली एक ‘इलेक्ट्रॉनिक्स टोल गोळा करण्याची प्रणाली’ आहे. हिचे संचलन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारे करण्यात येते. याची सुरुवात एक पथदर्शी प्रकल्प म्हणून सन २०१४ मध्ये सुवर्ण चतुष्कोणाच्या अहमदाबाद-मुंबई महामार्गाच्या एका भागात झाली.

दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या एका तुकड्यावर अशा प्रकारचा टोल गोळा करणे प्रथम ४ नोव्हेंबर २०१४ला सुरू करण्यात आले. जुलै २०१५पासून चेन्नै-बंगलोर या सुवर्ण चतुष्कोनाच्या आणखी एका तुकड्यावर या पद्धतीने टोल गोळा करणे सुरू झाले. एप्रिल २०१६ पर्यंत भारतभरातील राष्ट्रीय महामार्गाच्या सुमारे २४७ टोल प्लाझांवर ही योजना राबविण्यात आली.

हा आकडा एकूण टोल प्लाझांच्या सुमारे ७०% इतका येतो.भारतात डिसेंबर २०१७ पासून पुढे विकल्या जाणाऱ्या सर्व नव्या गाड्यांना फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याद्वारे, विना-रोख(कॅशलेस) पद्धतीने लवकर टोल जमा होईल व टोल प्लाझांवर जास्त वेळ थांबावे लागणार नाही. याने वाहनांच्या वाहतुकीचा वेळ कमी होतो व त्याचा फायदा होतो.

फास्टॅग कुठे मिळेल ?

तुम्हाला फास्टॅग खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत 100 रुपये आहे. त्याशिवाय तुमच्या गाडीप्रमाणे वेगळा चार्जही द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला SBI च्या बँकेत जाऊन पॉइंट ऑफ सेल वर जावं लागेल.इथे तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. हा फॉर्म भरून KYC डॉक्युमेंट्ची फोटोकॉपी द्यावी लागेल. यामध्ये तुमच्या गाडीची RC, एक ID प्रूफ, अ‍ॅड्रेस प्रूफ आणि फोटो द्यावा लागेल.

फास्टॅग रिचार्ज करणं सोपं

तुम्हाला जर फास्टॅग रिचार्ज करायचा असेल तर SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फास्टॅग सेक्शनवर क्लिक करावं लागेल.या सेक्शनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमचा मोबाइल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा की च्या मदतीने लॉग इन करा. लॉगइन केल्यानंतर तुमच्या गाडीचा पर्याय निवडा आणि रिचार्ज अमाउंट टाका. शेवटी पेमेंटचा पर्याय निवडून फास्टॅग रिचार्ज करा.

फास्टॅग विकत घेता यावा यासाठी काही दिवस मोफत !

लोकांना सहजपणे फास्टॅग विकत घेता यावा, यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे.बँका, इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासारख्या ठिकाणी फास्टॅगच्या विक्रीसाठी 18 नोव्हेंबरपर्यंत 28,500 विक्री केंद्र उभारण्यात आली आहेत.यासोबतच आरटीओ (RTO) कार्यालय, सर्व सेवा केंद्र, वाहतूक केंद्र आणि काही निवडक पेट्रोल पंपांवरही हे फास्टॅग उपलब्ध आहेत.

1 डिसेंबर पर्यंत लोकांना फास्टॅग मोफत देण्यात यावेत अशा सूचना केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्या आहेत. या फास्टॅगसाठीचे 150 रुपये 1 डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरेल.कार, जीप्स आणि व्हॅनसाठीचे फास्टॅग हे अॅमेझॉन, पेटीएम, स्टेट बँक, ICICI बँक, अॅक्सिस बँक, HDFC बँक, IDFC फर्स्ट बँक यांच्या वेबसाईटवरून ऑनलाईनही विकत घेता येतील.तुमच्या जवळचं फास्टॅग केंद्र शोधण्यासाठी अॅण्ड्रॉईड फोनवर My FASTag App डाऊनलोड करता येईल.

कोणती कागदपत्रं लागतील?

फास्टॅग घेण्यासाठी तुम्हाला गाडीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच RC, गाडीच्या मालकाचा पासपोर्ट साईझचा फोटो आणि ड्रायव्हिंग लायसन्स लागेल.सोबतच कागदपत्रांवरील रहिवासी पत्त्याच्या पुरावा म्हणून (Address Proof) आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा व्होटर आयडी दाखवावं लागेल.जर तुमच्याकडे दोन गाड्या असतील, तर तुम्हाला दोन्ही वाहनांसाठी वेगवेगळे फास्टटॅग घ्यावे लागतील.

एक फास्टॅग 5 वर्षं वैध असेल.

याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही टोलनाक्यापासून 10 किलोमीटरच्या परिघात रहात असाल तर तुम्हाला टोलमध्ये सूट मिळेल.कॅश बॅकच्या स्वरूपात ही सूट तुमच्या खात्यात जमा होईल.

Fastag टोल भरता येणारे फास्टॅग म्हणजे काय, तो कसा , कुठे मिळेल?

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.