वेगावर स्वार दोन पोलिस पुत्रांचा भीषण अपघातात मृत्यू ,एकाचे धडापासून शीर वेगळे

अपघात इतका भीषण होता की एकाचे शीर धडापासून वेगळे झाले आहे. वेगात जाणारी नवीन कोरी दुचाकी उभा असलेल्या कंटेनरवर वेगात आदळून हा अपघात झाला असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. fast sport bike two people died without helmet nashik police nashik news

सविस्तर वृत्त असे की, द्वारके कडे  आडगाव येथून नवीन दुचाकीने भरधाव वेगात  रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरवर पाठीमागून जबर आदळून अपघात झाला आहे. यामध्ये दोन पोलीसपुत्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा  अपघात इतका भीषण होता की एका तरुणाचे शीर धडापासून वेगळे झाले आहे. दुर्दैव असे की दोघांनी हेल्मेट घातले नव्हते.   fast sport bike two people died without helmet nashik police nashik news
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,  आडगावकडून द्वारकेकडे   नव्या  होर्नेट  बाईकवरून एकदम वेगात मृत  संदीप सुरेश गवारे (३०,रा. मडवाई हाईटस्, अमृतधाम) त्याचा मित्र सागर शेजवळ (३०, रा. ग्रामिण पोलीस मुख्यालय)  मित्र निघाले होते.  बळी मंदीर येथील  महामार्गावर उड्डाणपूलाचे जोरात बांधकाम सुरू असून, त्यामुळे अनेक दिवसाअगोदर येथील वाहतूक  एकेरी मार्गावरूनसुरू आहे.fast sport bike two people died without helmet nashik police nashik news

हा मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आलेला असून, त्या मार्गावरून रस्ता खुला असल्याचे समजून प्लॅस्टिक दुभाजक ओलांडून प्रवेश करत या दोघांनी दुचाकी भरधाव द्वारकेच्या दिशेने नेली होती. त्यात रस्त्यालगत उभ्या असलेल्या कंटेनरवर जी.जे.१८ एटी९९३४ वर  पाठीमागून त्यांची दुचाकी जाऊन आदळली. ही  धडक इतकी भीषण होती की एका दुचाकीस्वाराचे शीर धडावेगळे झाले आहे.  बळीमंदीराजवळ औदुंबरनगरसमोर हा अपघात घडला आहे.  या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी  कर्मचा-यांसह घटनास्थळी पोहचले होते. मृतदेह रुग्णवाहिकेतून त्वरित जिल्हा रुग्णालयात पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठविले.

हेल्मेट न घालता या वर्षात आतापर्यंत ११२  लोकांचा मृत्यू झाला आहे.तर १२ कालर चालकांनी कार मधील सीट बेल्ट वापरला नाही त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस प्रशासन आणि समाजिक संस्था वेळोवेळी हेल्मेट जनजागृती आणि वाहतूक नियम पाळावे म्हणून जागृती करत असते मात्र तरीही नियम तोडून या प्रकारे मृत्यू होत आहेत. यातील मृत्यू होणाऱ्या तरुणांचे प्रमाण अधिक असून २५ ते ४० मधील वयातील संख्या अधिक आहे. fast sport bike two people died without helmet nashik police nashik news

घरातील आपणा एक जबाबदार सदस्य असून, कमावते आहोत. आपल्यावर आई वडील व इतर जबाबदारी   आहे याचे भान असायला हवे. नियम आपल्या साठी   असून  त्यामुळे न पाळले तर आपले नुकसान आहे हे लक्षात असू द्या, हेल्मेट, सीट बेल्ट सोबत वाहतुकीचे नियम पाळा एक जबाबदार नागरिक व्हा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

fast sport bike two people died without helmet nashik police nashik news
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.