शेतकरी संप तीव्र : महाराष्ट्र बंदची हाक, १८ जणांवर गुन्हे, सामुहिक मुंडण

Share this with your friends and family

संप कायम, आंदोलने करून सरकारचा निषेध
येवलामध्ये १८ जणांवर गुन्हे दाखल  अनेक ठिकाणी भाजीपाल्याची नासाडी

शेतकरी पूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरुच ठेवण्याची भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे.  यामध्ये  5 जून रोजी मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्र बंदची शेतकरी राजाने दिली आहे. तर दुसऱ्या दिवशी  6 जूनला सर्व सरकारी कार्यालयाला कुलूप ठोकणार आहेत. जून  7 रोजी आमदार-खासदारांच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. पुणतांबा येथे किसान कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीसाठी बोलावलं आहे.

नाशिक : शेतकऱ्यानी पुकारलेले बेमुदत संपाच्या दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातून कुठल्याच प्रकारच्या शेतमाला आला नाही. तसेच विक्री देखील झालेली नाही. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी कोणताही भाजीपाला विक्रीसाठी आला नसल्याने ओस पडली आहे. नेहेमी लगबग असलेल्या बाजार समिती आवारात काही जण क्रिकेट खेळत आहेत, तर काही मालवाहू वाहने रिकामी उभी आहेत. बाजार समिती आवारात ‘आता बस्स, शेतकऱ्यांनो चला संपावर’ असे फलक लावलेले आहेत. येवला कोपरगाव रस्त्यावरील पिंपळगाव जलाल येथील टोल नाका येथे गुरुवारी झालेल्या शेतकरी संपात वाहने अडवून नुकसान केल्याप्रकरणी शुक्रवारी ४० ते ४५ शेतक-यांना पोलिसांनी या शेतक-यांना ताब्यात घेतले आहे. तर १८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याआधी गुरुवारी शेतकऱ्यांच्या संपामध्ये एका शेतकऱ्याचा जीव गेला. येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाक्यावरील किसान क्रांती मोर्चात सहभागी असलेल्या अशोक मोरे यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर आंदोलन सुरु असताना पोलीस आणि शेतकऱ्यामध्ये झटापट झाली. यावेळी लाठीचार्ज सुरु झाला. त्यानंतर मोरे हे पळत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं उपचारापूर्वीच निधन झालं. दुसरीकडेआता संपाचा परिणाम नागरीकांच्या जीवनावर दिसून आला आहे. भाजीपाला आणि दुध महागले आहेत.

प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन, प्रेत यात्रा

संपाच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी वेगवेगळ्याप्रकारे आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला. निफाड तालुक्यातील पालखेड मिरचिचे येथे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, माधव भंडारी आणि रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळयाची अंत्ययात्रा काढण्यात आली. तर धुळगावही येथे मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. सिन्नरच्या नांदूर शिंगोटे येथे बायपास जवळ नारळ, आंबे, टोमॅटो घेवून जात असतांना तीन मालट्रक शेतकऱ्यांनी पकडले. सिद्ध पिंपरीमध्ये सकाळी शेतकऱ्यांनी शहराला दूध पुरवठा करणारा टँकर रस्त्यावर रिकामा केला. यावेळी लाखो लिटर दूध शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतलं. तर त्यानंतर काहीच वेळात धान्याचा पुरवठा करणारा एक ट्रक शेतकऱ्यांनी आडवला. त्या ट्रकच्या चाकातली हवा काढली आणि त्यातल्या गव्हाच्या गोण्या रस्त्यावर फोडून तो फेकून दिला. यानंतर गाड्या अडवून धान्य आणि दूधाची नासाडी करणाऱ्या या शेतकऱ्यांवर पोलिसांना लाठीचार्ज केला. त्यातल्या २० शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सामुदायिक मुंडन
बागलाण तालुक्यातील डांग सौंदाणे येथे सरकारच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून पुतळा जाळण्यात आला. यावेळी शेतकऱ्यानी सामुदायिक मुंडन केले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.