शेतकरी संप : महाराष्ट्र बंद सर्व अपडेट बाजारसमित्या बंद

नाशिक येथे झालेल्या शेतकरी बैठकीनंतर आज राज्य बंदची हाक दिली गेली होती.त्यानुसार पूर्ण नाशिक सह पूर्ण राज्यात बंदला मोठा प्रतिसाद मिळत असून नाशिक येथील १९ मुख्य बाजार समित्या आजही बंद आहेत. तर अनेक ठिकाणी रस्ता बंद आंदोलन शेतकरी करत आहेत.शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केलाय. मुंबई बंद वगळून हा पाठिंबा असणार आहे. महाराष्ट्र बंदला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे.स्वाभीमानी शषतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी आज केवळ बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. लग्नाची तिथी असल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

नाशिक : महाराष्ट्र बंदला  सर्वत्र  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील असलेल्या  मनमाड,नांदगांव ,मालेगाव, कळवण, सटाना ,देवाळा  बाजार समिती व्यवहार ठप्प, येवला शहरात कडकडीत बंद ठेवला आहे. तर  धामणगाव येथे  शेतकऱ्यांकडून रस्त्यावर वांगे , कांदे , दूध फेकून सरकारचा निषेध केला आहे.

नाशिक : मनमाड, मालेगाव, चांदवडमध्ये महाराष्ट्र बंदला उत्तम प्रतिसाद, सर्व बाजार समित्या बंद ठेवल्या आहेत.

येवला तालुक्यातील सायगाव येथील ग्रामस्थांनी गेले चार दिवस विविध आंदोलने केली. आज गावात बंद पाळण्यात येत असून सरकारचा निषेध करत ग्रामस्थांनी कांदा फेक आंदोलन केले आहे.

सिन्नर येथे बंदला प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.आज दूधसंकलन बंद करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ व्यावसायिकांनीही बंद पुकारला आहे.

निफाड शहरासह तालुक्यातही बंद सुरू आहे. अनेक बाजार पेठा बंद असून कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही.

तर नांदुरमध्यमेश्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. रस्ता जाम आंदोलन केले त्यामुळे या ठिकाणी  असून वाहनांच्या रांगा रस्त्यावर लागल्या आहेत.

दिंडोरी तालुक्यातील पालखेड येथे भाजीपाला रस्त्यावर फेकण्यात आला आहे.

नाशिक – चांदवड तालुक्यातील दुगाव येथे बंद पाळण्यात आला आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांनी मनमाड-चांदवड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले असून, रस्त्यावर दूध आणि कांदा फेकला आहे.

अहमदनगर : संगमनेरमधील कोल्हेवाडी शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, पुतळ्याला जोडे मारुन सरकारचा निषेध केला आहे.

तर नाशिक येथील नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी, सटाना तालुक्यातील नामपूर येथील आठवडे बाजार शेतकऱ्यांनी ठेवले बंद, व्यापाऱ्यांचा बंदमध्ये सहभाग ,बाजारात शुकशुकाट असून सर्व व्यवसाय बंद आहेत.

चांदवड येथे आठवडे बाजार असूनही कडकडीत बंद पाळला गेला आहे. लासलगाव शहर बाजार समितीही बंद ठेवली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.