शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्यरितीने वापर करावा – गिरीश महाजन

नाशिक : पुणेगाव पोच कालव्यामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार असून , असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

चांदवड तालुक्यात परसूल येथे पुणेगाव पोच कालव्याच्या जलपूजन कार्यक्रमावेळी श्री. महाजन बोलत होते. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ.राहुल आहेर, चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, सरपंच परशुराम निकम, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता गिरीश संघानी, राजेंद्र शिंपी, राजेंद्र शिंदे, उपअभियंता राजेंद्र शिरवाडकर आदी उपस्थित होते.

श्री. महाजन म्हणाले, शेतकऱ्याला पाणी आणि वीज यांची प्रामुख्याने गरज असते. ती पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी नुकतेच राज्यातील अपूर्ण प्रकल्पांसाठी नाबार्डकडून कर्ज मंजूर करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन आणि सूक्ष्म सिंचनासारख्या आधुनिक पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे.

शेतकरी हा राष्ट्राच्या प्रगतीमधील सर्वात महत्वाचा घटक आहे. देशाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आलेले आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी याचा चांगला फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शाश्वत शेती करावी. धरणातील पाणी कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री.महाजन यांनी सांगितले.

https://www.facebook.com/NashikOnWeb/?ref=aymt_homepage_panel

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.