शेतकरीवर्गाने आधुनिक फलोत्पादन करावे – पवार

आता शतकरी वर्गाने सामुहिक शेती करणे फार गरजेचे आहे. त्यामुळे यामध्ये सर्वांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत कृषी उत्पादन वाढवले जात आहे. हे नवीन आधुनिक असे तंत्र जर विकसित असलेल आत्मसात केले. तर  कृषी उत्पादक विपणन कंपन्यांचे माध्यमातून कृषी मालाची विक्रीही वाढत येणार आहे. मात्र हे जरी असले तर अनेक ठिकाणी अनके समस्या समोर येत असून आता या सोडविण्यासाठी शुगर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर फलोत्पादन संशोधन संस्था व कृषीउत्पादन विपणन संघ स्थापण्याची काळाची गरज असल्याचे  प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले आहे.

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे शेतक-यांनी स्थापन केलेल्या कृषी माल आणि प्रक्रि या कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी शेतक-यांच्या समस्या जाणून त्यांना मार्गदर्शन केले. कादवाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते श्रीराम शेटे,आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह शेतकरी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. संस्थेच्या माध्यमातून वाघाड लाभक्षेत्रातील शेतक-यांनी वाघाड धरणातील पाण्याचे स्वयंस्फूर्तीने व्यवस्थापन करून आणि आधुनिक शेतीची कास धरल्याने हा परिसर आता स्वयंपूर्णतेकडे गेला आहे.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.