शेतकरी संप : ग्रामीण भागात शेतकरी आक्रमक तर शहरात संपाचे परिणाम

लासलगाव : आजपासून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचे परिणाम शहरी भागाला जाणवू लागले आहेत. अनेक शहरांत भाजीपाला, दूध आणि दैनंदिन आवश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागत असल्याने बळीराजाच्या या संपला यश मिळताना दिसत असून त्याचे परिमाण दिसण्यास सुरुवात झाली आहे.
पिक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहचू द्यायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही असा पवित्र शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतमालाला योग्य हमीभाव, कर्जमुक्ती अशा मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हा संपाचा एल्गार पुकारला आहे.

राज्यातील शेतकरी आजपासून संपावर गेला आहे. शेतकऱ्यांच्या संपामुळे दूध, भाजीपाला, फळं यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. www.nashikonweb.com

दुसरी ठिणगी लासलगावात

दरम्यान शेतकरी संपाची पहिली ठिणगी सातारा जिल्ह्यात पडली. या नंतर दुसरी ठिणगी ही लासळगावात पडली.लासलगाव-चांदवड मार्गावरील टाकळी फाट्यावर शेतकऱ्यांनी गाडी अडवून ८०० लिटर दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून देण्यात आल्या.पहाटे ३ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे.आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेलेले शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. गुरुवारी सकाळी राज्याच्या विविध भागात शेतमालाचे नुकसान करण्यात आल्याच्या घटना घडल्या.

शेतमाल शहरांपर्यंत पोहचू नये यासाठी आंदोलकांनी दूध आणि भाजीपाला रस्त्यावर ओतून दिला.निफाड तालुक्यातील टाकळी फाटा येथील संतप्त शेतकऱ्यांनी निफाड चांदवड मनमाड त्रिफुली येथे आज पहाटे तीन वाजता नांदगाव वरून नाशिककडे जाणाऱ्या दुधाच्या पिशव्या असलेल्या गाडया अडवून ७०० ते ८०० लिटर दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकल्या. www.nashikonweb.com

लासलगाव जवळील औरंगाबाद हमरस्त्यावर काल रात्री साडेबारा वाजता एका दुधाच्या टॅकरमधून दुध खाली करीत असताना एमएच 15 ए ए 3061 या लासलगाव पोलिसांच्या जीपवर दगडफेक झाली.

यावेळी पोलिसांनी जमावाला आटोक्यात आणण्यासाठी बळाचा वापर करीत 21 पैकी आठ जणांना ताब्यात घेऊन निफाड येथील पोलीस कोठडीत ठेवले आहे. याबाबत रात्री उशीरा माहिती समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे हे सहकारी कर्मचारी चालक आव्हाड यांच्या घटनास्थळी दाखल झाले. परंतु जमाव हिंसक झाला व पोलिसांच्या गाडीची काच फोडली.तातडीने निफाडचे पोलीस उपअधीक्षक दिपक गिर्हे व निफाडचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे व सायखेडा पोलिस कार्यालयाचे पोलीस सहाय्यक निरीक्षक मोरे हे घटनास्थळी दाखल झाले व 18 मोटारसायकल जप्त करून पोलिस स्टेशनमध्ये नेल्या. www.nashikonweb.com

भरवस फाट्यावर पोलिसांच्या गाडीवर दगडफेक

औरंगाबाद-नाशिक महामार्गावर वरील भरवस फाट्याजवळ सकाळी भाजीपाला घेऊन जाणारी वाहन अडवून  भाजीपाला फेकून देण्यात आला.यावेळी शेतकरीवर्गने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केल्याने पोलिसांच्या वाहनांचे काचा फुटल्या.लासलगाव पोलिसांनी यातील आठ आंदोलकांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडील १८ वाहने  ताब्यात घेतलेली आहे. या झालेल्या घटनेतशेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. www.nashikonweb.com

लासलगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीला शेतकऱयांनी ठोकले टाळे

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ला संतप्त शेतकऱ्यांनी ठोकले ताळे.शेतकऱ्यांनी विनायक पाटील आणि माधव भंडारी यांच्या वक्तव्य चा निषेध करत बाजार समितीला ठोकले कुलूप.लासलगाव बाजार समितीचे करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प झालेले असूनएरव्ही गजबजलेल्या समितीत आज शुकशुकाट पाहायला मिळत आहे. www.nashikonweb.com

दूध-भाजीपाल्याचे ट्रक अडवणारे शेतकरी अटकेत

औरंगाबाद-नाशिक महामार्गावर वरील भरवस फाट्याजवळ सकाळी दूध घेऊन जाणारी वाहन अडवून  २४ हजार लिटर दुधाचा टँकर कुलूप तोडून दूध रस्त्यावर ओतण्यात आला.यावेळी शेतकरीवर्गने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केल्याने पोलिसांच्या वाहनांचे काचा फुटल्या.लासलगाव पोलिसांनी यातील आठ आंदोलकांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडील १८ वाहने  ताब्यात घेतलेली आहे.या झालेल्या घटनेत शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला.

यावेळी पोलिसांनी जमावाला आटोक्यात आणण्यासाठी बळाचा वापर करीत 21 पैकी आठ जणांना ताब्यात घेऊन निफाड येथील पोलीस कोठडीत ठेवले आहे.याबाबत रात्री उशीरा माहिती समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे हे सहकारी कर्मचारी चालक आव्हाड यांच्या घटनास्थळी दाखल झाले. www.nashikonweb.com

शेतकऱ्यांच्या एलगार

शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला आहे. पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.शुकशुकाट पाहायला मिळत आहे. www.nashikonweb.com

बळीराजाच्या संपामुळे शहरातील जनता गॅसवर

दुसरीकडे शेतकऱ्यांनी संप पुकारल्यामुळे शहरातली जनता गॅसवर आहे. शेतकरी संपावर गेल्याने भाजीपाला, दूध कसं मिळणार या प्रश्नामुळे अशा अनेक प्रश्नांमुळे शहरातल्या जनतेची तारांबळ उडाली आहे. www.nashikonweb.com

विनायक पाटील आणि माधव भंडारीच्या वक्तव्याचा निषेध

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर संपकरी शेतकऱ्यांनी विनायक पाटील आणि माधव भंडारीच्या वक्तव्याचा तीव्र  निषेध करून शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. एकंदरीतच उद्भवलेल्या परिस्थितीला हे सरकारच जबाबदार आहे. सरकार हे शेतकरी विरोधी असून त्यांच्यामुळे शेतकऱ्यावर असे दिवस आले असल्याचे संपकरी सांगत आहे. www.nashikonweb.com

लासलगाव कडकडीत बंद

शेतकरी संपला।पाठींबा देण्यासाठी संपूर्ण शहरातील व्यापाऱ्यांनी आपआपली व्यवहारे बंद ठेवून पाठींबा दिला. www.nashikonweb.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.