उत्तम नियोजन, ऑटोमॅटिक यंत्रणा , प्रगत तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी-कृषिभूषण

उत्तम नियोजन, ऑटोमॅटिक यंत्रणा , प्रगत तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी केल्यास भारतीय शेतकरी स्पर्धेच्या युगात टिकेल.  उत्तम मालाचे उत्पादन केल्यास मालाची निर्यातही आपणास करता येऊन आर्थिकदृष्ट्या प्रबळ होता येईल असे प्रतिपादन कृषिभूषण पुरस्कार विजेते विलास शिंदे यांनी केले ते केटीएचएम महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण मंडळ आयोजित राज्यस्तरीय भविष्यातील भारत आणि युवक कार्यशाळेप्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड, प्रा.डी.एच.शिंदे होते.

भारत हा कृषिप्रधान देश असुन भारताचा विकास म्हणजे इंडिया विरुद्ध भारत असा होत आहे. इंडिया म्हणजे प्रगत शहरी औद्योगिक विकास होय तर भारत म्हणजे ग्रामीण कृषिप्रधान भारत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 
महाविद्यालयीन जीवनात तुम्ही तुमचे ध्येय ठरविले तसेच कठोर परिश्रम केले तर जीवनात निश्चित यशस्वी व्हाल असे मविप्र सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांनी सांगितले. 
यावेळी प्रमुख पाहुणे स्वागत व परीचय प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड तर प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी प्रा.डी.एच.शिंदे यांनी केले. यावेळी सूत्रसंचलन कु. माधुरी वाघ तर आभार प्रा.डी.व्ही.डोखळे यांनी मानले

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.