शेतकरी संपात फुट? नाशिकमध्ये माघारीस विरोध

Share this with your friends and family

नाशिक : आज पहाटे मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत शेतकरी संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता पुणतांबेच्या किसान क्रांती मोर्चाच्या कोअर कमिटीच्या संप मागे घेण्याच्या निर्णयाला खुद्द पुणतांबे येथील स्थानिकांचाच विरोध होतानाच दिसून येत आहे. याबाबत तेथील काही शेतकऱ्यांनी कोर कमिटीच्या लोकांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली आहे.

नाशिकमध्येही किसान क्रांती, नाशिकच्या कमिटीच्या लोकांनी या माघारीस विरोध दर्शवला आहे. आज ११ वाजता नाशिक बाजार समितीत बैठक घेण्याचा ठराव करण्यात आला असून त्यात होणार्या निर्णयानंतर भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे.

पुणतांबेतील आज सकाळी झालेल्या ग्रामसभेतील गोंधळ झाला आहे. केवळ आश्वासनांवर कोर कमिटी भुलली का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. कर्जमुक्ती नक्की कोणाला मिळणार आहे याबाबतही संभ्रम आहे.

नाशिकमधील बाजारसमितीत आजही शेतमालाची विक्री होऊ शकली नाही. दुधाचे व्यवहारही ठप्प असून आज सकाळचे संकलन झालेले नाही. त्यामुळे आज ११ वाजता होणारी बैठक महत्वपूर्ण असून यात काय होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

यामुळे संपात फुट पडल्याचे दिसून येत असून माघारीचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे असे थेट दोन गट शेतकऱ्यांमध्ये पडले आहेत. नाशिकची किसान क्रांतीची कमिटी स्वतः निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले असून मुंबईची मुख्य कृषी बाजारपेठ असलेल्या नाशिककडे आता सगळ्यांच्या नजरा आहेत. सरसकट कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी यावर शेतकरी ठाम आहेत.

पहाटेच्या वेळी निर्णय घेऊन शेतकरी संपात फूट पाडण्याचा सरकारचा डाव यशस्वी झाल्याचा आरोप यावेळी करण्यात येत आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.