शेतकरी संतप्त : बाजारात  लीलावात कांदा भाव पडले; अजून घसरण होण्याची शक्यता

बाजारात  लीलावात कांदा भाव पडले; अजून घसरण होण्याची शक्यता

नाशिक : बळी राजाला कोठे थोडा कांदा भाव मिळण्यास सुरुवात झाली होती.तोच आता कांदा आवक कमी असतांना सुद्धा भाव मिळण्याचे सोडून उन्हाळी कांदा भाव पडताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी संतापला आहे. तर बाजारात इजिप्तचा कांदा येणार म्हणून की काय भाव पडतायेत असे चित्र उभे केले जात आहे.

उन्हाळ कांद्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशीही घसरण सुरुच असून, सोमवारी पुन्हा कांद्याचे भाव पडले. येथील बाजार समिती आवारात कांद्याची आवक वाढल्यामुळे तसेच इजिप्तचा कांदा दाखल होण्याच्या धास्तिने चार दिवसात कांद्याच्या दरात ५०० रुपये क्विंटल ने भाव घसरलेले आहे.Source : https://www.nashikonweb.com

वर्षभरापासून गडगडणाऱ्या कांदा दराने अलीकडेच उसळी घेत अल्पावधीत प्रति क्विंटलला अडीच हजारांचा टप्पा ओलांडला. भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी चाळीत साठविलेला कांदा बाजारात नेण्यास प्राधान्य दिले. या सप्ताहात बाजार समित्यांना तीन ते चार दिवस सुटी असल्याने आवक लक्षणीय वाढून दर ५०० रुपयांनी खाली आलेले आहे.Source : https://www.nashikonweb.com

उन्हाळ्यात साठविलेला कांदा सप्टेंबर व ऑक्टोबपर्यंत बाजाराची गरज भागवितो. सद्य:स्थितीत महाराष्ट्र वगळता अन्य कोणत्याही राज्यात उन्हाळ कांदा नाही. त्याद्वारे देशाची दोन ते अडीच महिन्यांची गरज भागणार नसल्यामुळे बडे व्यापारी इजिप्तमधून तो आणून नफा कमावण्याची तयारी करीत आहे. इजिप्त आणि महाराष्ट्रातील कांद्याच्या चवीत कमालीचा फरक आहे. हॉटेल व्यावसायिक त्याचा वापर करतात. त्या ठिकाणी उपलब्ध माल, वाहतुकीला लागणारा कालावधी, त्याची टिकण्याची क्षमता यामुळे आयातीला मर्यादा आहेत. त्या कांद्याला भारतीय कांद्यापेक्षा कमी दर मिळतात. तो आल्यामुळे देशांतर्गत बाजारात दर घसरणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल लगेचच विक्री करण्याची घाई करू नये. माल टप्प्याटप्प्याने विक्री करून लाभ घ्यावा.

Laslgoan Onion Market Source : https://www.nashikonweb.com

काही व्यापाऱ्यांनी इजिप्तमधून कांदा मागविला आहे. तो कांदा आकाराने मोठा असला तरी चवीत फरक आहे. त्यामुळे त्याचा भाव भारतीय कांद्याच्या तुलनेत किलोला चार ते पाच रुपयांनी कमी असतो. कांदा आयातीची माहिती पसरल्याचा स्थानिक घाऊक बाजारावर मानसिक परिणाम झाला. भाव कमी होतील या धास्तीने शेतकरी मोठय़ा प्रमाणात माल बाजारात आणत आहे.

Source : https://www.nashikonweb.com

आवक वाढल्याने कांद्याचे दर क्विंटलला ४०० ते ५०० रुपयांनी कमी झाले. वास्तविक, इजिप्तमधून अतिशय कमी प्रमाणात कांदा येईल. स्थानिक शेतकऱ्यांनी त्या धसक्याने आताच कांदा विक्री केली तर सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये देशात कांदाटंचाई निर्माण होईल आणि भाव वाढतील असा अंदाज जानकर करीत आहे.लासलगांव बाजार समिती आवारातही कांद्याच्या आवकेत वाढ सुरूच असून, सोमवारी ८०० वाहनांतून कांदा विक्रिस आला होता. कांद्याला कमित कमी ६००, सरासरी १९५१ रुपये, तर सर्वाधिक २१०१ रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.