शेतकरी संप : दिवस सहा- शेतकरी संपात सहभागी शेतकऱ्याची आत्महत्या

नाशिक : शेतकरी संपात सहभागी झालेल्या आणि आंदोलन करत असलेल्या तरुण शेतकऱ्याने आपली जीवन यात्रा संपवली आहे. त्यामुळे हे आंदोलन खरच शेतकरी हिताचे होतय का हा प्रश्न निर्माण झाला आहे. तर हे आंदोलन आता काय वळण घेणार हे पहावे  लागणार आहे.

येवला येथील तरुण शेतकरी येवला येथील शेतकरी नवनाथ चांगदेव भालेराव यांनी  आत्महत्या केली आहे. ते अवघे ३० वर्षांचे होते,भालेराव यांनी  सोमवारी रात्री ११ वाजता  वाजण्याच्या सुमारास विष पिऊन त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. भालेराव यांनी आपली जीवन यात्रा  कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आहे. भालेराव हे सक्रीय कार्यकर्ते  होते. त्यांनी येवला लासलगाव येथे झालेल्या शेतकरी आंदोलनात नवनाथ हे सहभागी झाले होते.येवला ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

सुकाणू समिती ठरवणार आता पुढील रणनीती

शेतकरी संपावर आता तोडगा काढण्यासाठी आणि सरकार सोबत बोलण्यासाठी नवीन समितीची स्थापना करण्यात आली आहे.यामध्ये विशेष असे की स्वर्गीय ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांचे त्यांना सोडून गेलेले शिष्य पुन्हा एकत्र आले आहेत. शेती प्रश्‍नांना देशस्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी तसेच शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी शेतकऱ्यांची नवी सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये 21 जणांची नावे आहेत. त्यामुळे हे शेतकरी नेते आता पुढची नीती ठरवणार आहेत.मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागितले की जो कोणी शेतकरी संपाचा फायदा घेण्यासाठी राजकारण करेल तयासोबत सरकार कोणतीही बातचीत करणार नाही.तर फक्त शेतकरी यांच्यासोबत सरकार वाटाघाटी करणार आहे.

शेती अर्थतज्ज्ञ गिरधर यावेळी माध्यमांसोबत बोलताना म्हणाली की, आता या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची पुन्हा आखणी केली जाणार आहे. तर आम्ही आता यात सामील झालेल्या  राजकीय पक्षांना दूर केले आहे. हिंसात्मक आंदोलन थांबलं आणि अहिंसात्मक प्रभावी आंदोलन सुरू झालं आहे.

शेतकरी आंदोलनासाठी 21 जणांची नवी सुकाणू समिती – 1-राजू शेट्टी, 2 -अजित नवले, 3 -रघुनाथदादा पाटील, 4 -संतोष वाडेकर,5 -संजय पाटील, 6 -बच्चू कडू, 7 -विजय जवंधिया, 8- राजू देसले, 9 – गणेश काका जगताप, 10 -चंद्रकांत बनकर, 11 -एकनाथ बनकर, 12 -शिवाजी नाना नानखिले, 13 -डॉ.बुधाजीराव मुळीक, 14 -डॉ. गिरीधर पाटील, 15 -गणेश कदम,16 -करण गायकर, 17 -हंसराज वडघुले, 18 -अनिल धनवट, आदींचा यामध्ये समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या नावावर राजकीय पोळी भाजणारे आणि शेतकऱ्यांच्या नावावर  आंदोलन करणाऱ्यांशी आम्ही चर्चा करणार नाही. खऱ्या शेतकरी नेत्यांशी चर्चा करायला आम्ही आजही तयार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.