Farmer Suicide जिल्ह्यात दर महिन्याला पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या,

कर्ज आणि निसर्गाच्या लहरीपणात अडकलेल्या शेतकरी वर्गावर काळाने घाला घातला आहे. जिल्हा पाण्याने समृद्ध जरी असला तरी शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत. उलट या वर्षीच्या ११ महिन्याचा विचार केला तर ऐकून ६४  शेतकऱ्यांनी  आपले जीवन संपवले आहे. या पैकी त्यांच्या ३६ कुटुंब सरकारी मदतीसाठी  पात्र ठरले असून, २६   प्रकरणे  हे अपात्र ठरले आहेत. तर यातील २ प्रकरणे प्रलंबित होणार आहेत. ( Farmer Suicide)

याचाच अर्थ की दर महिन्याला सरासरी पाच  शेतकर्‍यांनी आपले जीवन संपवले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शेतकरी आत्महत्यांच आढावा घेतला आहे. या मध्ये दुष्काळ, नापिकी, कर्ज यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या केल्या आहेत असे समोर आले आहे.

त्यातच मागील वर्षी २०१८ मध्ये  ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यात धुडगूस घातला. या काळात साधारणत: १५ शेतकर्‍यांनी आत्महत्या करुन जीवन संपविले आहे.जिल्ह्यात वर्ष २०१९ मध्ये ६४  शेतकर्‍यांनी आपले  जीवन संपविले.

त्यापैकी ३६ शेतकर्‍यांच्या कुटुंबांना शासनाकडून मिळणारी एक लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. तर २५ शेतकरी या कुटुंब मदतीसाठी अपात्र ठरले आहे. यामध्ये आजारपण, व्यसनाधिनता, कौटुंबिक कलह यांसारख्या कारणांनी आत्महत्या केल्याचे रिपोर्ट मध्ये  निष्पन्न झाले आहे.

मागील  वर्षी २०१८ मध्ये पूर्ण  जिल्ह्यात १०८ शेतकर्‍यांनी आपले जीवन संपवले होते. तर आत्महत्या ज्यांनी केली आहे त्या शेतकरी कुटुंबाला शासन आर्थिक मदत देते. त्यासाठी आत्महत्येचे नेमके  कारण, नावे असणारी जमीन, कर्ज आदींबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला तलाठी व तहसीलदार स्तरावरून मिळते या प्रकरणांची तपासणी करुन नंतरच मदतीसाठी पात्र ठरणारी प्रकरणे मंजूर करण्यात येत असतात.(Farmer Suicide)

तालुकानिहाय आत्महत्या

दिंडोरी- १५ ,

मालेगाव- १३,

निफाड- १०,

सिन्नर- ०५ ,

बागलाण- ०४

नाशिक- ०२,

चांदवड- ०३,

नांदगाव- ०४,

त्र्यंबकेश्वर- ०२,

पेठ- ०१

येवला- ०२,

कळवण- ०२,

देवळा- ०१

एकूण ६४ आत्महत्या !

https://www.facebook.com/NashikOnWeb/
आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.