बोडके यांनी सौर कृषी पंपाचा वापर करुन आपली बागायती शेती फुलविली

दि.16-सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथील शेतकरी संजय बोडके यांनी सौर कृषी पंपाचा वापर करुन आपली बागायती शेती फुलविली आहे. शेततळ्यातील पाणी कृषी पंपाच्या साह्याने शेताला देता येत असल्याने उन्हाळी कांद्यालाही त्याचा लाभ होत आहे.FARMER SANJAY BODHAKHE USE SOLAR POWER TO GENERATE ELECTRICITY FARMING WATER PROBLEM SOLVE  

सिन्नरसारख्या कमी पावसाच्या भागात सिंचनासाठी विहिर किंवा शेततळ्याचा उपयोग केला जातो.  वीजेची उपलब्धता वेळेवर  न झाल्याने  सिंचन प्रक्रीयेत समस्या निर्माण होतात. ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने सौर कृषी पंप योजना सुरू केली.FARMER SANJAY BODHAKHE USE SOLAR POWER TO GENERATE ELECTRICITY FARMING WATER PROBLEM SOLVE  

पंपातून पडणारे पाणी आणि प्रगतीशील शेतकरी

योजना सुरू झाल्यावर शेतकरी त्यावर विश्वास करायला तयार नव्हते. बोडके यांचेकडे दोन विहीरी आणि शेततळे होते. मात्र वीजेच्या लपंडावामुळे पिकांना वेळेवर औषधे व पाणी देणे शक्य होत नसे. त्यामुळे बोडके यांनी 2016 मध्ये सौर कृषी पंपासाठी अर्ज केला. त्यांच्या या धाडसाबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला.FARMER SANJAY BODHAKHE USE SOLAR POWER TO GENERATE ELECTRICITY FARMING WATER PROBLEM SOLVE  

तीन हॉर्सपॉवरच्या कृषी पंपाची किंमत साधारण चार लाख रुपये होती. शेतकऱ्याला केवळ पाच टक्के रक्कम भरावयाची असल्याने बोडके यांनी 20 हजार 250 रुपये महावितरणच्या कार्यालयात भरले.FARMER SANJAY BODHAKHE USE SOLAR POWER TO GENERATE ELECTRICITY FARMING WATER PROBLEM SOLVE  

सौर उर्चेचे शेतात योग्य मांडणी, स्वतःची स्वतः उर्जा निर्मिती, शेताला वेळेत पाणी

जैन सोलर पंपच्या प्रतिनिधींनी स्वत: कृषी पंप शेतात बसवून दिला. कक्ष अभियंता सुदर्शन सुर्यवंशी यांनी बोडके यांना योजनेबाबत चांगले मार्गदर्शन केले. दिवसा सिंचनाची सुविधा झाल्याने शेत फुलायला लागले. द्राक्षाचे क्षेत्र साडेतीन एकराने वाढले. सोयाबीनसोबत टमाटे आणि कांदे शेतात पिकू लागले.FARMER SANJAY BODHAKHE USE SOLAR POWER TO GENERATE ELECTRICITY FARMING WATER PROBLEM SOLVE  

बोडके यांना शेताला पाणी देण्यासाठी वीजेची वाट पहावी लागत नसल्याने कृषी कामांनी देखील वेग घेतला आहे. भविष्यात बागायती क्षेत्र वाढविता येईल असा विश्वास त्यांच्या मनात कृषी पंपामुळे निर्माण झाला आहे.FARMER SANJAY BODHAKHE USE SOLAR POWER TO GENERATE ELECTRICITY FARMING WATER PROBLEM SOLVE  

संजय बोडके, शेतकरी-

सौर कृषी पंपामुळे पाण्याची पाळी चुकत नाही. देशभाल खर्चदेखील शून्य असल्याने शेतकऱ्याला याचा खुप फायदा आहे. तीन वर्षात देखभालीसाठी काहीच खर्च करावा लागला नाही.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.