mathematician विख्यात गणितज्ज्ञ दिलीप गोटखिंडीकर यांचे निधन

नाशिक- विख्यात गणितज्ज्ञ आणि पेठे हायस्कूलचे माजी शिक्षक दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि.२९) सकाळी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. mathematician

कृष्णाजी गोटखिंडीकर यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि.२९) सकाळी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.  गणितासारखा विषय  सहज सोप्या पध्दतीने शिकवणारे आणि अन्य अनेक संस्थांशी निगडीत असलेल्या गोटखिंडीकर यांच्या  निधनामुळे शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

दोन हिन्यांपूर्वी हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. त्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी नाशिक अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यंसस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी पुष्पा गोटखिंडीकर, मुलगा अजेय, मुलगी अर्चना दीक्षीत यांच्यासह सून, जावई, नातवंडे असा परीवार आहे.

पुरस्कार आणि सन्मान

(१) जीवन गौरवपुरस्कार- देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था

(२) दीपस्तंभ पुरस्कार- शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण संस्था

(3) Invited Speaker award – association of mathematics teachers of India

(४) Distinguished teacher award – Association for International Mathematics Education and Research

(५) मराठी विज्ञान परिषद -सन्मानपत्र

(६) अतिथी व्याख्याता ९ वे मराठी भाषा विश्व संमेलन,कंबोडिया आणि अनेक स्थानिक सन्मान व पुरस्कार mathematician

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.