falotpadan phalbag training session
नाशिक : सन 2019-20 मध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष शेतावर प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरी, पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणास इच्छुक शेतकरी बंधूनी दि. 10 डिसेंबर 2019 पर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे सादर करावेत असे आवाहन, उपविभागीय कृषि अधिकारी, नाशिक यांनी केले आहे.
अर्ज सादर करतांना अर्जासोबत 7/12 उतारा, आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कार्यक्रम 5 दिवसांसाठी आहे. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास दि. 15 डिसेंबर 2019 रोजी तालुकास्तरावर सोडत काढून जेष्ठता सूचीनुसार प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना निवड पत्र, कार्यक्रमाची तारीख-स्वरुप व आवश्यक लोकवाटा याबाबत तालुकास्तरावरुन कळविण्यात येणार आहे. falotpadan phalbag training session
कृषी क्षेत्र वृत्त तसेच शेतमाल बाजारभाव बघण्यासाठी इथे क्लीक करा.