आलिशान गाडीचे बक्षिसाचे आमिष, लाखोंची फसवणूक,  दिल्ली येथून दोन प्रकरणात ६ ताब्यात

नाशिक : आलिशान गाडी तुम्ही जिंकली असून, ती हवी असल्यास अमुक , अमुक रक्कम भरा आणि बक्षीस घरपोहोच मिळावा असे सांगत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन प्रकरणे  नाशिक पोलिसांनी तडीस नेले आहे. या मध्ये पोलिसांनी दिल्ली येथून दोन वेगळ्या प्रकरणात ६ संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे. यामुळे अनेक प्रकरणाचा शोध लागण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,    किरण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना इथीऑस ही कार बक्षीस म्हणून लागली असून, ती हवी असल्यास वेळो वेळी फोन करत १ लाक ९१ हजार ८९६ रु. पेएटीएम द्वारा पैसै मागवले होते. मात्र निर्धारीत वेळेत कोणतेच बक्षीस न आल्याने पाटील यांनी सायबर क्राईम कडे तक्रार केली. पोलिसांनी सर्व बँकेचे व्यवहार तपासले असता त्यांना पैसे woldshopy, shopbyselelct.com आणि puloutcar या सर्व खात्यांवर पैसे गेल्याचे समजले तर यातील पत्ता हा दिली येथील होता. वेळ न दडवता नाशिक पोलिसांनी एन एच एफ १९ ओखल औद्योगिक परिसर येथून छापा टाकत शत्रुघ्न कुमार राय,प्रकाश सिद्धार्थ सोनटक्के, आकाश गुप्ता, मोसिन मुहम्मद अस्लम याना ताब्यात घेतले. तर कार्यालयात एकत्र असे १ लाख ६७ हजार ५९० रु. साहित्य जप्त केले आहे. या सर्वाना १८ जुलै पर्यंत न्यायलयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

दुसऱ्या प्रकरणात निलेश बालाजी मंडलिक यांना होंडा अमेज कार बक्षीस लागली असून त्यासाठी वेळो वेळी फोन करत विश्वास संपादन करत ४ लाख ७४ हजार ३१५ रु. उकळले होते आणि कोणतेही बक्षीस त्यांना प्राप्त झाले नाही. या सर्व बँक व्यवहार आणि इतर माहिती पोलिसांनी तपासली असता सर्व व्यवहार हा दिल्ली येथील वसंत विहार परिसरात झाला आहे असे उघड झाले. नाशिक पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या सोबतीने परिसरातून सुनिता गोवर्धन नेगी, सय्यद रझा हुसेन झैदी यांना ताब्यात घेतले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.