जुळ्या बहिणींनीच केला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; नवीन सिडकोतील धक्कादायक प्रकार

सिडको, नाशिक : Overprotective parents raise the best liars असे काहीसे वाचले असतानाच नाशिकमध्ये हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सिडकोत राहणाऱ्या ९ वर्षीय जुळ्या बहिणींनी शिकवणी बुडवली म्हणून आई रागवेल, मारेल या भीतीने चक्क स्वतःच्या अपहरणाचा बनाव केला.

घडलेली घटना अशी की, या दोघी बहिणी शिकवणी वर्गाला जातो असे सांगत शिकवणीच्या नेहमीच्या वेळेत घराबाहेर पडल्या. मात्र त्या दोघी शिकवणी वर्गाला न जाता मंदिरातच थांबल्या. तिथेच खेळत राहिल्या. घरी निघताना मात्र हे आईला समजले तर ती आपल्याला मार देईल या भीतीने त्यांनी स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला.

twin sisters fake kidnapping show nashik नाशिक अपहरणाचा बनाव जुळ्या

त्यांनी घरी उशिरा पोहचल्यानंतर स्वतःचे अपहरण झाल्याचे घरी सांगितले. यामुळे घाबरलेल्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. ९ वर्षाच्या या जुळ्या बहिणींच्या कारनाम्यामुळे तिच्या पालकांसह पोलीस व नागरिकांचीही चांगलीच धावपळ झाली. स्वतः पालक व परिसरातील नागरिक त्यांनी सांगितल्याप्रमाणे जिथे घटना घडली तिथे बघण्यास गेले. पोलिसही घटनास्थळी पोहचत तपासाची चक्रे जोमाने फिरवली. पुढे या मुलींनी स्वतःच्या मनाने सांगितलेल्या एका घरामध्ये कोंडून ठेवल्याचा धाग्यावर एकाला ताब्यातही घेण्यात आले.
पुढे घटनेचे अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना संशय आल्याने त्यांनी दोघा बहिणींशी स्वतंत्रपणे संवाद साधला. दोघींच्या बोलण्यात तफावत असल्याने मग सत्य समजले. दोघं बहिणींनी आई रागवेल म्हणून एका टीव्ही सिरियल मध्ये बघितल्या प्रमाणे स्वतःच्या अपहरणाचा बनाव केला असल्याचे समोर आल्याने पोलिसांवरील दबाव कमी झाला आणि सगळ्यांनीच निःस्वास सोडला.

पोलीस आपल्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत असले तरी आपली मुले असे पालकांना एवढ्या धाकात असल्याचे चित्र समोर आले आहे. आपण आपल्या पाल्यांचे शिक्षणासह इतरही मानसिकता समजून घेणे आवश्यक असून आपल्या धाकाने मुले खोटे बोलत असतील तर ही नक्कीच चिंतेची बाब आहे. आपण त्यांच्यावर दबाव निर्माण न करता चांगला संवाद साधत राहिलो तर त्यांना खोटे बोलण्याची वेळच येणार नाही.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.