Exotice Spa स्पावर छापा अनैतिक व्यवसाय

नाशिक : कॉलेज  रोड परिसरातील एस के मॉल येथील पहिल्या मजल्यावर सुरु असलेल्या स्पावर पोलिसांनी आज छापा मारला आहे. यामध्ये अनैतिक व्यवसाय सुरु असल्याचे खबर पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी अचानक आज छापा टाकत कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांनी आठ  महिला आणि  पाच पुरुषांना ताब्ब्यात घेतले आहे. अत्यंत देखण्या आणि उत्तम ठिकाणी हा वैश्य व्यवसाय सुरु होता. 

कॉलेज रोड परिसर हा श्रीमंत परिसर म्हणून ओळखला जातो. काही वर्षात जुन्या नाशिक भागातील अनेक दुकाने,व्यापरी आणि इतर व्यवसाईक येथे स्थाईक झाले आहेत. त्यामुळे हा सर्व भाग रहदारी आणि गर्दीने नेहमी फुललेला असतो. तर याच भागात मध्यवर्ती भागात व्यापारी अर्थात कमर्शियल  मॉल आहे. मोठ्या प्रमाणत भाडे आणि जागेला भाव यामुळे अनेकांना येथे व्यवसाय करता येत नाही. जे श्रीमंत आहेत ते येथे गाळे घेतात.

त्यामुळे या भगत अश्या प्रकारे स्पा सुरु जरी असला तरीही त्यात अनैतिक व्यवसाय सुरु असतील यात शंका येणे शक्य नव्हते.याचाच फायदा घेवून येथे हा व्यवसाय सुरु असावा.पोलिसांना याचा सुगावा लागताच त्यांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेश देवीकर यांनी महिला पोलिसांच्या पथकासोबत येथील ‘एक्झोटिक’ स्पा सेंटरवर धाड टाकली आहे.असून स्पा सेंटरचा मालक संशयित परेश सुराणा हा फरार आहे.  देहविक्रीच्या व्यवसाय चालविण्याप्रकरणी पोलिसांनी पुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. स्पा सेंटरवर कारवाईची दुसरी वेळ आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.