‘एक्सक्लेम’ मधून उत्तम कलाकृतीचे दर्शन घडले: आ.आहेर

आयडिया कॉलेजचे एक्सक्लेम २०१७वार्षिक प्रदर्शन संपन्न
महाविद्यालयाकडून दोन नवीन अभ्यासक्रमांची घोषणा
एक्सक्लेम मधून उत्तम कलाकृतीचे दर्शन घडले: आ.आहेर
नाशिक :आयडीया कॉलेजच्या एक्सक्लेम २०१७ मधून या प्रदर्शनातून जगातील उत्तम कलाकृतीचे दर्शन घडले असल्याचे मत आमदार डॉ.राहुल आहेर यांनी व्यक्त केले. ते प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी बनविलेल्या प्रतिकृतीची माहिती करून घेतली.  
 
विद्यावर्धन ट्रस्ट यांचे इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनव्हारमेन्ट अॅण्ड आर्किटेक्चर (Institute for Design Environment and Architecture) अर्थात आयडिया कॉलेजच्या एक्सक्लेम २०१७या वार्षिक प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. गेल्या चार दिवसांपासून कुसुमाग्रजस्मारक, गंगापूररोड, येथे प्रदर्शन सुरु होते. यावेळी शहरातील नामवंत वास्तूविशारद, इंटीरियर डिजाइनर, चित्रकार, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालक आदी मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. यावेळी संस्थेचे संचालक विजय सोहनी, डीन विवेक पाटणकर आदी उपस्थित होते.  
 
दरवर्षी सुरु असलेली एक्सक्लेमची वाटचाल पाहता प्रदर्शनात मोठी प्रगती होत असून लवकरच शहरातील सर्वोत्तम प्रदर्शनांपैकी हे एक ठरले असा विश्वास संतोष बेदमुथा यांनी व्यक्त केला. यावेळी विविध स्पर्धामध्ये यश संपादीत केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रदर्शनासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इबको, फिनोलेक्स पाईप आणि अपोलो पेट यांनी अर्थ सहाय्य दिले.  
आयडियाकडून दोन नवीन अभ्यासक्रमांची घोषणा
या प्रदर्शनाचे औचित्य साधत महाविद्यालयाने दोन नवीन अभ्याक्रमांची घोषणा केली. यात जाहिरात आणिइंटीरियर डिजाइन ही दोन्ही क्षेत्रे सृजनशील आहेत. येथे नेहमीच नविन आणि प्रयोगशील लोकांना आपलेसे केले जाते. इतर क्षेत्राप्रमाणे इथेही डीजीटल क्रांती झालेली आहे. याकडे पाहता महाविद्यालयाकडून आगामी शैक्षणिक वर्षापासून दोन स्वायत्त स्वरूपाचे अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. यात डिप्लोमा इन डीजीटलइंटीरियर डिजाइन आणि डिप्लोमा इन डीजीटल अप्लाइड आर्ट असे दोन्ही थेट रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आहेत. विशेष म्हणजे यासाठी शिक्षणाची कुठलीही अट नसून फक्त १० परीक्षा पास असणे अनिवार्य आहे.
 
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.