एव्हरशाईन प्रोफेशनल क्रिकेट कप 2019 : टीम एनसीएला विजेतेपद

नाशिक : एव्हरशाईन स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीतर्फे आयोजित ‘एव्हरशाईन प्रोफेशनल कप 2019’ स्पर्धेत रविवारी (दि.3) झालेल्या अंतिम सामन्यात टीम एनसीएने टीम सीसीएनचा 35 धावांनी दणदणीत पराभव करीत विजेतेपद पटकावले. Evershine Professional CUp 2019 Team nca winners

संदीप फाउंडेशनच्या क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या या अंतिम सामन्यात स्पर्धेतील एका इनिंगची सर्वाधिक धावसंख्या नोंदवताना कर्णधार नितीन धात्रक (34 धावा), निलेन्द्र राजपूत आणि श्रीरंग कापसे यांच्या खेळींच्या जोरावर टीम एनसीएने 15 षटकांत 178 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात मुझफ्फर सय्यद (36 धावा) आणि फयाझ (39 धावा) यांनी केवळ 3.3 षटकांत ५० धावांची सलामीची खेळी करताना आपले इरादे स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर एकामोगोमाग फलंदाज बाद होत गेल्याने टीम सीसीएनला 143 धावांवर रोखण्यात यश येऊन टीम एनसीएने विजेतेपदाला गवसणी घातली. श्रीरंग कापसे सामनावीर ठरले.

तत्पूर्वी सेमी फायनल मध्ये टीम सीसीएनने एव्हरशाईन डॉक्टर्सचा पराभव केला. तर टीम एनसीएने एनडीसीए सिनिअरचा मोठा पराभव करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. Evershine Professional CUp 2019 Team nca winners

सिझन चेंडूवर खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत एकूण 259 चौकार मारले गेले. तर 43 षटकार मारले गेले. टीम एनडीसीएचे हर्शल साळुंके यांनी सर्वाधिक 4 षटकार खेचले तर टीम सीसीएनने फयाझ यांनी सर्वाधिक 19 षटकार खेचले.

या स्पर्धेत एनडीसीए सिनिअर, सीसीएन, सनराईज, एनसीए, टीम गर्जना, नाशिक जिमखाना, एव्हरशाईन डॉक्टर्स या 8 संघांत 120 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. एव्हरशाईन प्रोफेशनल कप’ मध्ये 35 वर्षावरील डॉक्टर्स, सी.ए., आयआरएस ऑफीसर्स, वकील, आर्किटेक्ट, उद्योजक, एनडीसीए, सीसीएन या क्षेत्रात काम करणारे व खेळाची आवड असणार्‍यांचा समावेश होता.

यासाठी एचडीएफसी बँक, सनराईज हॉस्पीटल, स्पर्श हॉस्पीटल, साई हाय टेक डायग्नोस्टीक, डीसीबी बँक, साफल्य हॉस्पीटल, शिवकला इमॅजिंग, तेजस्वी ज्वेलर्स यांचे सहकार्य लाभले.

अभिषेक शास्री आणि सय्यद जावड यांनी पंचांची जबाबदारी पेलली. अविनाश बगल स्कोररची भूमिका पार पाडली.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी एव्हरशाईन स्पोर्ट्सचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध भांडारकर, सेक्रेटरी तुषार चव्हाण, खजिनदार महेश उपाध्ये, मिलिंद गांगुर्डे, संतोष दिंडे, जितेंद्र शाह, विनोद कर्डीले, निलेश सिंग आदी मेहनत घेतली.

Evershine Professional CUp 2019 Team nca winners
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.