इंग्रजी शाळेतील ७४ मुलांना खाज, उलटी आणि मळमळ , विषबाधेचा संशय

शहरातील बोरगड परिसरात असलेल्या प्रसिद्ध इंग्रजी शाळा  न्यू ग्रेस अकॅडमी येथील  सुमारे 74 विद्यार्थ्यांना खाज, उलटी आणि मळमळ होऊ लागल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या संशयातून त्यांना उपचारासाठी  जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.  
भाजपाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रोहीनी नायडू यांच्या स्वंयअर्थ सहाय्यित न्यू ग्रेस अकॅडमी या शाळेत गुरुवारी दि.29 सकाळी साडदहा ते अकरावाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. एक नंतर एक विद्यार्थी शरीराला जोरदार  खाज येत आहे या बद्दल तक्रार करू लागला होता. स्थितीचे गांभीर्य ओळखून शाळा प्रशासनाने तत्काळ सर्व विद्यार्थ्यांना  जिल्हारुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.  

School Students In Hospital

Doctrani  त्यांच्यावर त्वरित  उपचार सुरू  केले होते. या शाळेतील शिक्षकांनी घडलेल्या प्रकाराविषयी दिलेल्या माहिती देताना सांगितले की , आज  सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचे जेवन झाल्यानंतर हात धुत असताना हा प्रकार घडला, शाळेत येणारे सर्व विद्यार्थी घरुनच त्यांचा टिफिन घेऊन शाळेत येतात. त्यामुळे परिसरात शाळेतून  कोणत्याही अन्न पदार्थातून   विषबाधा होण्याचा कोणताही प्रश्नच उपस्थित राहत नाही. तरीही अचानक शाळेतील 74 विद्यार्थ्याची प्रकृती बिघाडल्याने शाळाप्रशानाच्या कार्यपद्धतीविषयी शंका निर्माण झाली आहे. 

तर  जिल्हा रुग्णलायातील डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना विषारी किटक चावल्यामुळे अशा प्रकारचा त्रास उद्भवल्याचा संशय व्यक्त केला आहे. यातील दाखल करण्यात आलेल्या दहा विद्यार्थ्यांनी  उलटटी केली आणि त्यांना मळमळसोबत चक्कर देखील येत होत्या.  मात्र सुदैवाने इतर मुलांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती दिली आहे.
जिल्हा रुग्णालयातील डॉ. विठ्ठल काळे, डॉ.डी.बी जगताप आणि डॉ. स्वप्नील जैन यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व रुग्णांची तत्काळ तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.