आज हटविणार अंबड लिंक रोडवरील भंगार बाजार, न्यायालयाने केला १० हजाराचा दंड

गेल्या जानेवारीत हटविण्यात आलेला अंबड सातपूर लिंक रोड वरील भंगार बाजार पुन्हा एकदा थाटला गेला. आता तो पुन्हा काढण्यासाठी पोलीस आणि महानगरपालिका सरसावले असून आज (दि. १२) रोजी नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने हटविण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ २ तर्फे अतिरिक्त फौजफाट्यासह पोलीस बंदोबस्त असणार आहे. यासाठी काल (दि. ११) ला पोलीसांमार्फत संचालन करण्यात आले.

दरम्यान, महापालिकेकडून अतिक्रमण हटविण्याचे संकेत मिळाल्यानंतर स्क्रॅप मार्केट असोसिएशनने उचा न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने असोसिएशनला ठणकावले. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम आदेश दिलेला असताना वारंवार येऊन न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याचा ठपका ठेवत १० हजार रुपयांचा दंडही केला. महापालिकेसह या प्रकरणात परी केलेल्या दिलीप दातीर यांचे वकील अॅड. केतन जोशी यांनी केलेल्या युक्तिवादानुसार ही दंडाची कारवाई करण्यात आली तसेच यापुढे न्यायालयात न येण्याच्या सूचना करत दुसरी जागा मागण्याचा अधिकार येथे दुकाने असलेल्या मालकांना नसल्याचेही स्पष्ट केले. महापालिकेमार्फत अॅड. एम. एल. पाटील यांनी बाजू मांडली.

परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी भंगार बाजार व्यावसायिकांना नोटीसा बजावल्या असून अतिक्रमण काढतेवेळी कायदा सुव्यवस्था राखण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. या कारवाई दरम्यान राज्य राखीव दलाच्या पथकालाही पाचारण करण्यात आल्याची माहिती नाशिक शहर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली आहे.

ambad link road bhangar bazar in nashik

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.