नाशिक शहर हरीत शहर, स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक या संकल्पनेला साजेसा सन 2020 चा श्रीगणेशोत्सव पर्यावरण पुरक साजरा व्हावा हा दृष्टीकोन नाशिक महानगरपालिकेचा होता. त्यादृष्टीने शहरात कोविड-19 सदृश्य परीस्थिती असल्याकारणाने नागरीकांपर्यंत सोशल मिडीया व फिजीकल डिस्टन्सींगची खबरदारी लक्षात घेता आणि नागरीकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मुर्ती संकलन व पर्यावरणपुरक श्रीगणेशोत्सव साजरा होणेकामी “मिशन विघ्नहर्ता व टिम” तसेच नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्लॉट बुकींगची सुविधा उपलब्ध करून त्याअनुषंगीक कामकाज “फॉक्सबेरी टेक्नोलॉजि, प्रा.लि.” यांनी केलेल्या कामकाजात मोठया प्रमाणात नाशिकरांचा सहभाग नोंदविण्यात आले होते. Ganesh Festival
“नाशिक महानगरपालिकेच्या” व “मिशन विघ्नहर्ता टिम” यांच्या संकल्पनेतून पर्यावरण पुरक (Eco Friendly Ganesh Festival) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्याअनुषंगाने या स्पर्धेसाठी एकुण 450 पेक्षा अधिकतम स्पर्धकांनी सहभाग नोंदवून पर्यावरण पुरक शाडु मातीची श्रीगणेशमुर्ती थर्माकॉल व प्लास्टीकचा वापर टाळणे, हरीत गणेशाला प्राधान्य देणे या सर्व बांबीचे कमिटीने निरीक्षण करून पुढील प्रमाणे एकुण 3 पारीतोषिक निश्चित केले त्यामध्ये प्रथम पारीतोषिक श्रीम.वैष्णवी बाळासाहेब कापसे, नाशिक. (प्रथम पारीतोषिक), श्री.तेजस विजेंद्र पाठक, नाशिक. (व्दितीय पारीतोषिक), श्री.सागर राजेंद्र खैरनार, नाशिक. (तृतीय पारीतोषिक) घोषित करण्यात येऊन मा.महापौर सतिश नाना कुलकर्णी, मा.आयुक्त कैलास जाधव यांचे उपस्थितीत काल दिनांक 29 सप्टेंबर 2020 रोजी धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याबाबत “मिशन विघ्नहर्ता टिम” व “फॉक्सबेरी टेक्नोलॉजि, प्रा.लि.” यांच्या संयुक्त विद्यामाने सामाजिक बांधिलकीला अनुसरून आणि विना मोबदला सहकार्याबद्दल त्यांनाही आभारपत्र बहाल करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी मा.सभागृह नेते सतिश सोनवणे, मा.उपआयुक्त मनोज घोडे पाटील, मा.उपआयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग करूणा डहाळे, अधिक्षक अभियंता एस.एम.चव्हाणके, पशुवैद्यकिय अधिकारी प्रमोद सोनवणे, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना व प्रकटीकरण घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक, डॉ.कल्पना कुटे यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेंद्र मोरे यांनी केले.Ganesh Festival