डॉ. नमिता कोहोक ग्लोबल युनायटेड पिजंट स्पर्धेत ग्लोबल युनायटेड लाइफटाइम क्वीन

नुकत्याच अमेरिकेत झालेल्या ग्लोबल युनायटेड पिजंट स्पर्धेत डॉ. नमिता कोहोक यांना ग्लोबल युनायटेड लाइफटाइम क्वीन हे नामांकन मिळाले आहे.  नाशिकचे आणि देशाचे नाव डॉ. नमिता कोहोक यांनी उज्वल  केले आहे. अमेरिकेतील मिनीसोटा, मिनेपॉलीस येथे ही स्पर्धा पार पडली होती. डॉ. कोहोक यावर्षी ५१ देशांमधुन नामांकन मिळवून लाइफटाइम क्वीन बनल्या असून देशासाठी आणि नाशिकसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.Dr Namita Kohok Global United Lifetime Queen Global United Pigante Championship

ग्लोबल युनायटेड पिजंट ही स्पर्धा एका आगळ्यावेगळ्या कारणासाठी जगात प्रसिद्ध  असून, स्पर्धेत भाग घेणाऱ्या जगभरातील सौंदर्यवती या स्वत: कॅन्सरवर मात केलेल्या असतात. त्या कॅन्सर जनजागृतीचे काम अविरत  करतात. डॉ. नमिता कोहोक यांची २०१७ साली मिसेस ग्लोबल युनायटेड २०१७ म्हणून निवड करण्यात आली होती. डॉ. नमिता कोहोक यांच्या मुळेच भारतात प्रथमच हा मोठा सन्मान मिळाला होता. जगातील कॅनडा, मलेशिया, अमेरिका अशा देशांमधुन त्यांची निवड झाली आहे.Dr Namita Kohok Global United Lifetime Queen Global United Pigante Championship

मागच्या वर्षी डॉ. नमिता कोहोक यांनी  कॅन्सरच्या जनजागृतीसाठी , कॅन्सरग्रस्त मुलांसाठी निधी जमा करतानाच गरजू मुलींच्या शिक्षणासाठी काम केले आहे. डॉ. नमिता कोहोक यांनी  वृद्धाश्रमात काम केले असून स्वत: कॅन्सरवर मात करुत त्यांनी जीवनात यश मिळवले आहे. त्या करत असलेल्या समाजपयोगी कामांची  नोंद ५१ देशात घेतली गेली आहे. या किताबामुळे त्या आयुष्यभर या स्पर्धेच्या अविभाज्य घटक बनल्या आहेत. लाइफटाइम क्वीन हा किताब दिर्घकालीन कामानंतर मिळतो. पण तो डॉ. नमिता यांनी दुसऱ्या  वर्षी मिळवला असून त्यांच्या कामाची पावती म्हणून तो त्यांना ५१ देशांमधून मिळालेल्या पसंतीनुसार जाहिर करण्यात आलाआहे. त्यामुळे आपल्या देशासाठी ही अभिमानाची बाब ठरली   आहे.

Dr Namita Kohok Global United Lifetime Queen Global United Pigante Championship

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.