डाॅ. दीक्षित डायट प्लॅन : रविवारी नाशकात 3 डी वाॅकेथाॅन

Dr Dixit Diet Plan Awareness Walkathon Nashik 15 Sept

15 सप्टेंबर रोजी जगभरातील १९४ शहरामध्ये वाॅकेथाॅन

नाशिक : मधुमेहमुक्तीचा लढा उभारून मराठी मनांत विशिष्ट डायट प्लानची आखणी करत नवसंजीवनी निर्माण झाली ती डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्यामुळे. मधुमेह दुर हाेण्याबराेबरच वजन कमी करण्यास जगभरातील नागरिकांना मदत हाेत आहे. याच डाॅ. दीक्षित डायट प्लॅनबाबत अधिकाधिक नागरिकांना माहिती व्हावी यासाठी रविवारी (दि. १५) राेजी ३ डी वाॅकेथाॅनचे २० देशामध्ये १९४ देशामध्ये आयोजन करण्यात आले आहे.

शहरात इंदिरा नगर जाॅर्गिंग ट्रॅक येथून या वाॅकेथाॅनला सुरुवात हाेणार असून डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्यासह पाेलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांची प्रमुख उपस्थित असणार असल्याची माहिती अॅडाेर ट्रस्टचे विश्वस्त संदीप साेनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मधुमेहापासून कायमस्वरुपी मुक्तता देण्यासाठी डाॅ.दीक्षित प्रयत्न करत आहे. मधुमेहाच्या विराेधात नागरिकांमध्ये अधिक जनजागृती व्हावी यासाठी डाॅ. श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीचे औचित्य साधत ५ किलाेमीटरचे वाॅकेथाॅनचे आयाेजन करण्यात आलेले आहे.

विशेष म्हणजे क्रांतीकारी ठरणारा हा डायट प्लॅन फाॅलाे करत असलेल्या २० देशातील १९४ शहरामध्ये १५ सप्टेंबर राेजी एकाचवेळी हा उपक्रमाचे आयाेजन करुन विश्वविक्रम नाेंदविला जाणार आहे.

डाॅ. जनन्नाथ दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड्रार ट्रस्टचे विश्वस्त व स्वंयसेवक यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.

शहरात इंदिरानगर जाॅगिंग येथून हाेणार वाॅकेथाॅनला प्रारंभ
३ डी वाॅकेथाॅनचे १५ सप्टेंबर राेजी शहरातील इंदिरानगर जाॅगिंग ट्रॅक सीटी गार्डन येथून सुरुवात हाेणार आहे. सकाळी ७ ते ९ या कालावधीत हा अनाेखा वाॅक हाेणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन यांनी साेनवणे यांनी केले.

Dr Dixit Diet Plan Awareness Walkathon Nashik 15 Sept

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.