लासलगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर १२७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

लासलगाव (वार्ताहर समीर पठाण) : लासलगाव येथे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे लासलगाव पंचक्रोशीतील सर्व नागरीक आणि समाजबांधव या प्रसंगी उपस्थित होते. dr babasaheb ambedkar 127th birth anniversary celebration lasalgaon news

सकाळी १० वाजता सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमापुजन करण्यात आले या प्रसंगी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण केले तसेच जयंती अध्यक्ष राहुल केदारे,उपाध्यक्ष राहुल शिरसाठ,आरिफ बेग यानी पुष्पहार अर्पण केले.या प्रसंगी गरजू गरीब विध्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आली.

रमाई व यशोधरा महिला मंडळ यांच्या तर्फे त्रिसरण पंचशिल आणि भिमस्तुती पठन करण्यात आले.

सदर कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डी के जगताप, पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, माजी पंचायत समिती सदस्य सदस्य प्रकाश पाटील, प्रकाश दायमा, शंतनु पाटील, गुणवंत होळकर, राजेंद्र चाफेकर, डॉ विकास चांदर, रिपाइ नेते कैलास केदारे, सोनु शेजवळ, पवार सर यानी मनोगत व्यक्त केले. dr babasaheb ambedkar 127th birth anniversary celebration lasalgaon news

या कार्यक्रमा प्रसंगी साळवे सर, बगाडे सर, सागर आहीरे, मंगेश आहीरे, विकास खंडीझोड, बबलु केदारे, संतोष शेजवळ, साहेबराव केदारे, डॉ चारुदत्त आहीरे, मिलिंद गायकवाड, अशोक गायकवाड, भास्कर शेजवळ, विपुल शेजवळ, राजु शेजवळ, पिंटु शेजवळ, बद्री शेजवळ तसेच लासलगाव चे सरपंच संगिता शेजवळ, सुशिला शेजवळ, छायाताई जाधव, निर्मला शेजवळ, कांचन साळवे, आरती भालेराव, तुळसाताइ शेजवळ, सौ बगाडे, ग्रा प सदस्या श्वेता मालपाणी, सौ जाधव, सौ ब्रम्हेचा, सौ शंभरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ अमोल शेजवळ यानी केले तर आभार विलास खैरनार यानी मानले.

dr babasaheb ambedkar 127th birth anniversary celebration lasalgaon news

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi and your  name and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.